धर्मादाय संस्था कशी चालवायची? सहाय्यक धर्मादाय आयुक्त पाईकराव यांनी दिली माहिती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत, प्रभागसंघ वैधानिक पूर्तता संदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा प्रकल्प संचालक संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेच्या सभागृहात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक धर्मादाय आयुक्त शिवाजी पाटील, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक आसिफ शेख, भागवत फुलसुंदर तसेच क्लार्क राजेश कनकी, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यशाळेला उमेद अभियानातील जिल्हा व तालुक्यातील, जिल्हा व्यवस्थापक, प्रभागसंघ पदाधिकारी, सर्व तालुक्यातील BM-IBCB, आदर्श प्रभागसंघाचे प्रभाग समन्वयक यांचा समावेश होता.
कार्यशाळेच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संजय पाईकराव (सहा.धर्मादाय आयुक्त) यांनी उपस्थिताना ,प्रभागसंघाचे वैधानिक कार्य, संस्था नियम, घटना , कार्यकारी संचालक मंडळ व पदाधिकारी यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, वैधानिक अनुपालन करण्यासाठी मासिक व सर्वसाधारण बैठकाची नोटीस व इतिवृत्त, प्रभाग संघ संस्थाना अनुपालन करण्यासाठी आवश्यक कागदपत्र व कालमर्यादा,प्रभाग संघ कार्यकारी मंडळ व पदाधिकारी यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, तसेच संस्था नोंदणी ऑनलाइन संगणकीकरण प्रक्रियेची अंमलबजावणी यावर अतिशय सोप्या भाषेत सखोल मार्गदर्शन केले. तसेच उमेद अभियानातील महिला प्रभाग संघ संस्थानी ग्रामीण भागातील तळागाळातील महिलांसाठी कल्याणकारी कामे करून देशाच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन केले. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे कार्यकारी संचालक सदस्य बदल करणेसाठी “चेंज द रिपोर्ट ” प्रभागसंघातील आर्थिक व्यवहाराचे वैधानिक ऑडिट, वार्षिक अंदाजपत्रक, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे संस्था नोंदणी अनुपालन केल्यास होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रभागसंघातील पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपले अनुभव व अडचणी शेअर केल्या. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागी प्रभागसंघ पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागसंघातील वैधानिक अनुपालन पूर्तता कामकाज अधिक सक्षमपणे करण्याचा संकल्प केला.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिता माने यांनी केले.
0 Comments