मोहोळ को.ऑप.बँकेच्या टेंभुर्णी शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न
टेंभुर्णी,(कटूसत्य वृत्त):- मोहोळ अर्बन को-ऑपरेटिव बँक, टेंभुर्णी शाखेचा ग्राहक संवाद मेळावा,धनश्री हॉटेल-टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आला होता.
उपस्थित बँक खातेदारांना माहिती देताना बँकेचे चेअरमन डॉ.सागर नंदकुमार फाटे म्हणाले,बँकेच्या ठेवी २४ कोटी असून १५ कोटी कर्जे दिली आहेत. ढोबळ एनपीए १•६५ टक्के व नेट एनपीए झिरो टक्के आहे व ऑडिट वर्ग 'अ ' आहे.
ठेवीला व्याजदर ८:५० % आहे. तरी जनतेने मोहोळ अर्बन बँकेमार्फत आर्थिक व्यवहार करावेत असे आवाहन केले.
ग्राहकांच्या सूचनांचा विचार करुन बँकेच्या सेवेमध्ये आणखी सुधारणा करण्याचा शब्द दिला. यावेळी डॉ.धनाजी खताळ (मंगल हॉस्पिटल),प्रदीप कांबळे (कृष्णा गॅस),गणेश बापू केचे(सोनाई संचालक),सचिन जगताप (जिल्हाध्यक्ष- संभाजी ब्रिगेड), जोहर आवटे (अं.नि.स.), शिवाजीराव पाटील(मा.जि.प. सदस्य), ॲड.बाळासाहेब पाटील,सहकार्य उद्योग समूहाचे प्रकाश (आप्पा) सुभेदार पाटील, आकाश फाटे (संचालक),भागवत सुभेदार पाटील(मा.संचालक आदिनाथ सा. कारखाना),कृषी भूषण दादासाहेब पाटील व नंदकुमार विश्वासराव फाटे (संस्थापक),यांनी मनोगत व्यक्त केले.
तर नागनाथ कांबळे(निवृत्त डी. डी.आर.),गोरख बाप्पा देशमुख, नागनाथ पवार(व्हाईस चेअरमन),सुनील लोकरे,पांडुरंग कानडे,रणजीत देशमुख,लालचंद माळी,अशोक वाघमारे,दादासाहेब देशमुख,स्वप्निल पाटील इत्यादी उपस्थित होते.
प्रास्ताविक सहाय्यक व्यवस्थापक नितीन शिंदे यांनी केले. बँकेच्या सोयी- सुविधा याबाबत व्यवस्थापक सुदर्शन शिंदे यांनी तर डिजिटल बँकिंग बद्दल सहाय्यक व्यवस्थापक भैरवनाथ जाधव यांनी माहिती दिली.
आभार प्रदर्शन टेंभुर्णी शाखेचे व्यवस्थापक अमोल ताबे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मचारी संदीप शिंदे,सोनाली हवालदार,सुधीर मोरे,सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक सिकंदर मुजावर, प्रवीण शिंदे, आकाश शिंदे खेलुदेव वाघमोडे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments