काँग्रेस शिक्षक सेल पदाधिकारी नियुक्ती संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत शिक्षक सेल नूतन पदाधिकारी नेमणूक मा. चेतन नरोटे (अध्यक्ष- सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी) यांच्या हस्ते व श्रीशैल रणधीरे (सरचिटणीस-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), सुबोध सुतकर (अध्यक्ष- काँग्रेस शिक्षक सेल) एन के क्षीरसागर (माजी नगरसेवक), भीमाशंकर टेकाळे (अध्यक्ष- सेवादल), अशोक कलशेट्टी (प्रदेश सचिव- सेवादल), तिरुपती परकीपांडाल (सोशल मीडिया प्रमुख), दीपक आवाड (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. काँग्रेस भवन येथे शिक्षक सेल कार्यालयाचे उद्घाटन याप्रसंगी चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. नूतन कार्यकारिणी प्रमाणे- डॉ. बासीत इंगळगी (कार्याध्यक्ष), मुबीन मडकी (सरचिटणीस), शरद फुंदे (सरचिटणीस), इलियास शेख (सोशल मीडिया प्रमुख).
सदर कार्यक्रमास कार्तिक चव्हाण (प्राचार्य- वसंतराव नाईक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज), इस्माईल शेख (प्राचार्य- अहिल्याबाई प्रशाला व ज्युनिअर कॉलेज), सुधाकर गायकवाड (मुख्याध्यापक- भोलेनाथ विद्यालय), पंकज सुतकर (प्राध्यापक-यशोधरा जुनिअर कॉलेज), रणजीत सावंत, शाहिद जमादार, इरफान पटेल, उमेश चौधरी, सिद्धेश्वर बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर खानापुरे यांनी केले.
0 Comments