हर घर तिरंगा – 2025" अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट घेत कृतज्ञता केली व्यक्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्य दिन २०२५ निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "हर घर तिरंगा - 2025" या राष्ट्रभक्तिपर मोहिमेअंतर्गत शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा व पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशाला येथील विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचा भाव मनात बाळगून, आपल्या जीवनाचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलाचे आभार मानत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी तिरंग्याच्या गौरवासाठी आणि देशासाठी सुरक्षा करणाऱ्या पोलीस अधिकारी व जवानांप्रती भावना व्यक्त करणारी पत्रे लिहिली आणि त्या पत्रांसह सोलापूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना कृतज्ञता अर्पण केली. ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून त्यांनी पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीबाबत थेट संवाद साधत राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा घेतली.
या उपक्रमामध्ये उपअभियंता अविनाश वाघमारे, कनिष्ठ अभियंता अभिजित बिरसदार पाटील, चेतन परचंडे, तसेच शाळांचे शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना, सामाजिक भान आणि पोलीस दलाबद्दल आदर वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
0 Comments