Hot Posts

6/recent/ticker-posts

जिजाऊ ज्ञान मंदिरातील विद्यार्थ्यांची गरुड झेप

 जिजाऊ ज्ञान मंदिरातील विद्यार्थ्यांची गरुड झेप





  कोंडी, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा क्रिडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर सोलापूर तालुकास्तरीय योगासन स्पर्धा विवेकानंद पब्लिक स्कूल सोलापूर येथे  पार पडल्या या स्पर्धमध्ये  जिजाऊ ज्ञान मंदीर इंग्लिश मिडियम स्कूल व विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोंडी येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी घेतली .
           या स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील विद्यार्थ्यांनी नेत्र दिपक यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत  आहे.
१४ वर्ष  वयोगटां मध्ये  मुलं व मुली: योगासन स्पर्धेत  
 १) आविष्कार प्रसेंजित काटे: प्रथम क्रमांक
17 वर्ष वयोगटां मध्ये
१) *प्रज्ञा नारायण नीळ
 तृतीय क्रमांक*
 
 २) शंभुराजे नागेश जाधव:
    तृतीय क्रमांक
 १९ वर्ष वयोगटांमध्ये : मुलांमध्ये मध्ये
१) राजवीर भोसले प्रथम क्रमांक
२) अभिषेक बालाजी सुरवसे तृतीय क्रमांक  क्रमांक*  
तर मुलीं मध्ये
१) वैष्णवी नागनाथ दळवे *तृतीय क्रमांक
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये यशाच्या मार्गावरून जाणाऱ्या अनेक विद्यार्थी असतात परंतु यश मिळवणारे मात्र कमी असतात. जिजाऊ ज्ञान मंदिर मधील सर्व विद्यार्थ्यानी उत्कृष्ट कामगिरी केली या सर्व यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा प्रचंड यश मिळावे. सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा सर्व शिक्षकांनी दिल्या.आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात .विद्यार्थ्यांना सुद्धा उंच भरारी घेण्यासाठी चांगले शिक्षक रुपी पंखच असावी लागतात.
 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा प्राचार्य सुषमा निळ यांनी दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक दिलीप भोसले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . याप्रसंगी प्राचार्य सुषमा निळ , मुख्याध्यापिका  अर्चना औरादे , मुख्याध्यापक वैभव  मसलकर , एन के भोसले,दादासाहेब नीळ आधीसह शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थी पालक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments