महिलाओके सन्मान मे.. अजितदादा मैदान मे.. अशा घोषणा देत महिलांनी केक कापून साजरा केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 24, 2024

महिलाओके सन्मान मे.. अजितदादा मैदान मे.. अशा घोषणा देत महिलांनी केक कापून साजरा केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस

 महिलाओके सन्मान मे.. अजितदादा मैदान मे..
अशा घोषणा देत महिलांनी केक कापून साजरा केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील जी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व जन विश्वास सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे सरचिटणीस विनायक रायकर, सहसचिव सायन्ना हनुमनला यांनी न्यू बुधवार पेठ डॉ.बाबसाहेब आंबेडकर उद्यान येथे 250 गरजू महिलांना मोफत साडी भेट देण्याचा उपक्रमाचे  आयोजन केले होते. जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार ,अमोलदादा वामणे यांच्या शुभहस्ते व सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, समन्वयक दत्तात्रय बडगंची,युवती अध्यक्ष किरण माशाळकर , ज्येष्ठ नेत्या शोभा सोनवणे, सोशल मीडिया विभाग शहर - जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रम जल्लोष पुर्ण वातावरणात महिलांनी उत्साहात आणि जल्लोषात 'महिलाओके सन्मान मे अजित दादा मैदान मे, 'एकच वादा अजित दादा , अशा घोषणा देत केक कापला महिलांनी एकमेकांना केक भरवत   अजितदादांना खा सुनील तटकरे साहेबांना शुभेच्छा दिल्या.

सुरवातीस भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुजन करून बुद्ध वंधना घेऊन वंदन करण्यात आले त्यानंतर उपमुख्यमंत्री  जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांचा सत्कार अमोल वामणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित भैय्या अवघडे यांच्या हस्ते गरजूंना साड्या भेट देण्यात आल्या. यावेळी एकच वादा अजित दादा, विकासाचा वादा अजित दादा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आपल्या भाषणात जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित भैय्या अवघडे, विनायक रायकर,सायन्ना हनुमनला यांनी घेतलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खासदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार हे नेहमी महिलांसाठी सातत्याने विशेष योजना आणत आहेत याचा लाभ कोट्यावधी महिलांना होत आहे  त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर दादांच्या व तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित भैय्या अवघडे, विनायक रायकर, सायन्ना  हनुमनला हे सामाजिक काम करत असून येणार्या काळात राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टी कडून अजितदादाच्या नेतृत्वाखाली सुजित भैय्याला ताकत दिली जाईल जमलेल्या तमाम माता भगिनींचे शुभेच्छा पर आशिर्वाद नेहमीच सुजितच्या पाटी राहो अमोल दादा वामणे यांची साथ निश्चितच सोबत राहील अशी खात्री व्यक्त करीत सर्व उपस्थितीतांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आनंद इंगळे ,विजयानंद काळे बुद्ध प्रकाश ननवरे दत्ता सोनवणे आशिष कदम रोहित गायकवाड सुरज कांबळे राजन निकाळजे ओंकार खेड नागेश भंडारे चेतन वाघमारे हार्दिक सरवदे सुमित जानराव विकास कदम अश्वदीप जानराव तुषार कदम व भीम मुद्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages