रेल्वे ने पेलले आषाढी चे आव्हान; समाधानी झाले भक्तगण
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रवासाचे उत्तम असे नियोजन केले होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापक निरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना पंढरपूरकडे येण्यासाठी आणि पंढरपूर हुन परत जाण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली होती.
नियोजनातील ठळक वैशिष्ट्ये-
पंढरपूर रेल्वे स्थानकावर लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने सोलापूर रेल्वे विभागातील प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकारी देखरेखीसाठी स्वतः पंढरपूर येतेच उपस्थित होते. त्यापैकी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी कटाक्षाने प्रत्येक नियोजनाचे निरीक्षण स्वतः उपस्थित राहून केले. त्यात प्रामुख्याने नियंत्रण कक्ष, स्टेशन परिसर स्वछता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि भाविकांसाठी असणाऱ्या या इतर सेवांची चोख पाहणी केली.
रेल्वे स्थानकावर येणाऱ्या भाविकांची सुरक्षा आणि सामानाची त्यांना हवी असणारी मदद याची संपूर्ण जबाबदारी विभागीय सुरक्षा आयुक्त आदित्य आणि त्यांची टीम व्यवस्थितपणे पार पाडली. 24 तास सीसीटीव्ही च्या साह्याने प्रत्येक क्षनावर लक्ष केंद्रित करत होते.
अभियांत्रिकी, टीआरडी, परिचालन आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून 24 तास रेल्वे ट्रॅक आणि गेट वरून जाणाऱ्या पालख्यांना गेट ओलांडून देण्यासाठी मदत करीत होते. रेल्वे विभागाकडून वेळोवेळी पॉवर ब्लॉक घेण्यात आले होते . त्यामुळे वारकर्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावं लागला नाही.
वारकऱ्यांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ सुरक्षित टेंट्स व्यवस्था करण्यात आली होती.
अतिरिक्त फॅन आणि मोठ्या प्रकाराचे लाईटची व्यवस्था गेटवर आणि रेल्वे परिसरात करण्यात आली होती.
त्वरित कचरा निर्मूलनाची व्यवस्था करण्यात आली होती.
रेल्वे स्थानकात पाच ‘मदत सहाय्यता केंद्र' व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे भाविकांना प्रत्येक येणाऱ्या - जाणाऱ्या ट्रेनची माहिती वेळेवर मिळत होती.
रेल्वे मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना स्वास्थ्य संबंधित लागणाऱ्या इमर्जन्सीसाठी रेल्वे परिसरात अंबुलन्स ची व्यवस्था करण्यात आली होती आणि रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रिज वर तैनात राहून 24 तास प्रवास यांना मार्गदर्शन करण्याचे काम चोख पार पाडली.
आरपीएफ आणि वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 24 तास प्रवासी भाविकांना रेल्वेच्या वेळेसंबंधी ‘मदत सहाय्यता केंद्र' च्या माध्यमाने नियमित सूचना दिल्या.
यांत्रिकी विभागाने गाड्यांच्या मेंटेनन्स, साफसफाई आणि ट्रेन मध्ये पाणी भरण्याची सोय केली.
परिचालन विभागाच्या वतीने सर्व रेल्वे गाड्या या वेळेवर चालविण्यात आल्या.
आषाढी वारीच्या अनुषंगाने रेल्वे ने केलेल्या नियोजनाचा आढावा आणि सांख्यिकी माहिती -
यंदाच्या वर्षी नियमित आणि विशेष अश्या 212 गाड्यांची सेवा पंढरपूर साठी पुरविण्यात आल्या .
एकूण 1.66 लाख भाविकांनी पंढरपूर यात्रेसाठी रेल्वेच्या प्रवासाला आपली पसंती दर्शविली.
भाविकांना पुरवलेल्या या सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत 87.02 लाख रुपये जमा झाले.
पंढरपूर येथील आषाढी वारीच्या आनुषंगाने सोलापूर रेल्वे विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये सहायक वाणिज्य व्यवस्थापक सुदर्शन देशपांडे आणि लखन झां, सहायक सुरक्षा आयुक्त दिनेश कन्नोजिया,सहायक परिचालन व्यवस्थापक (सामान्य) एल.पी.सिंग,सहायक विभागीय अभियांत्रिकी (पंढरपूर) जनार्दन प्रसाद यांनी प्रत्यक्ष पंढरपूर येथे उपस्थित होते. रेल्वे विभागाच्या वतीने पंढरपूर रेल्वे स्थानक येथे आखलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रवासी भाविक समाधानी असल्याचा अभिप्राय उपस्थित अधिकाऱ्यांच्या समवेत व्यक्त केला.
No comments:
Post a Comment