भारतीय जैन संघटनेच्या वतीने डॉक्टर डे साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 2, 2024

भारतीय जैन संघटनेच्या वतीने डॉक्टर डे साजरा

 भारतीय जैन संघटनेच्या वतीने डॉक्टर डे साजरा

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जाते. या उद्देशाने भारत सरकारने 1जुलै 1991 मध्ये डॉक्टर दिन स्थापित केला. डॉक्टर दिन हा केवळ भारतातच नव्हे तर वेगवेगळ्या देशांमध्येही साजरा केला जातो .जीवनावर प्रेम कसे करावे हे फक्त डॉक्टर शिकवू शकतात  .पश्चिम बंगालमधील दिग्गज  डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ ही तारीख निवडण्यात आली डॉक्टर राय यांनी पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून ही काम केले हा दिवस डॉक्टरांच्या समर्पण कार्यनिष्ठा आणि आपल्या जीवनासाठी शेवटी देशासाठी सेवा याचा सन्मान आणि अभिवादन करण्यासाठी साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने भारतीय जैन संघटनेच्या वतीने ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. आदर्श मेहता नेत्र रोग तज्ञ डॉ. रश्मी मेहता हृदयविकार तज्ञ डॉ. सिद्धांत गांधी यांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील विभागीय सदस्य वालचंद पाटील जिल्हा सदस्य विक्रांत बशेट्टी, ओम पाटील यांनी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages