भोसरे हरित क्रांती पार्ट 1 ...
माणसांना अडवून माणसांची जिरवण्यापेक्षा पाणी अडवून जर पाणी जिरवलं तर येणाऱ्या कित्येक पिढ्या आपल्या या सदन आणि समृद्ध होतील. म्हणूनच मी मागील तीन वर्षापासून अनेक गावागावांमध्ये वनविभागाच्या सहकार्यातून जिथे जिथे वनभाग आम्हाला मोकळा मिळेल, तिथे तिथे आम्ही 2×2 च्या चारी खोदल्या. काही ठिकाणी झाडे लावली. आणि त्यात चाऱ्यांमध्ये पाणी अडवण्याचे काम केलं. कोट्यावधी लीटर पाणी जाग्यावर आणुन राहिले अन तेच पाणी जमिनीत जिरले. पावसाळा चालू झाला आणि पावसाच्या पहिल्याच धडाक्यात आजूबाजूच्या तीन ते चार किलोमीटर परिसरामधल्या विहीर आणि बोर गच्च भरलेल्या पहायला मिळाल्या . उन्हाळ्यामध्ये केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान आमच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवते.
भोसरे, ढवळस, बारलोणीचा माळ, भोगेवाडी अशा अनेक गावांमध्ये वनविभागाच्या सहकार्यातून आम्ही चाऱ्या खोदल्या. आणि त्या चाऱ्यांमध्ये पावसाळ्यात पहिल्याच पावसात गच्च भरून पाणी साचल्यामुळे भूगर्भातली जल पातळी ही उंचावली गेली. त्याचा परिणाम विहीर आणि बोर मध्ये दिसून आला. भोसरे गावाच्या बार्शी रोडवरील वन विभागामध्ये आम्ही दोन वर्षांपूर्वी आणि मागील वर्षी देखील दोन टप्प्यात चाऱ्या खोदल्या होत्या . अनेक झाडंही लावली. त्यातली मागील वर्षी दुष्काळामुळे काही झाड दगावली. ती पुन्हा या वर्षी आम्ही वृक्षारोपण नव्याने करतोय. या चार्यांमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लवकरच भोसरे गाव हरित क्रांतीचा पार्ट दोन समोर आणतोय . मी आधी काम करतो मग सांगतो, हे मी केलय . दुसर्याच्या हल्यावर बसुन मी दिल्ली बघायची स्वप्न कधीच पाहत नाही. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातुन बेंद ओढ्यात ऊजनीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला . लवकरच भोसरे चा ऊर्वरीत भाग देखील कोणत्याही ऊचल पाण्याशिवाय हरित क्रांती मध्ये सामिल करुन दाखवू . माझ्या पाठिशी आजुबाजुचे सर्व शेतकरी ठामपणे ऊभा राहिले . आम्हाला सातत्याने मामा दादा यांनी सहकार्य केले. वनविभाग मधील वरिष्ठांचे देखील आभार मानतो.
रस्ते गटारी हा विकास शेतकऱ्यांना शाश्वत बनवत नाही तो ठेकेदारांना रग्गड बनवतो. शेतकरी समृध्द करायचा असेल भुजलपातळीवर डीप-लेवलवर जाऊन काम झाल पाहिजे. परिसरातील शेतकऱ्यांमधून आलेल्या प्रतिक्रिया या कामाची पोचपावती होती. माणसे कितीही आडवी आली तरी त्यांना आडवं जाण्यात मला कसलाही रस नाही. मला पाणी आडवण्यात सगळ्यात मोठा रस आणि छंद आणि आवड आहे.
व्याख्याते हर्षल बागल


No comments:
Post a Comment