लाखो नागरिकांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या आरोपीला ठोकल्या रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या आरोपीसह केमिकल टॅंकर ताब्यात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 20, 2024

लाखो नागरिकांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या आरोपीला ठोकल्या रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या आरोपीसह केमिकल टॅंकर ताब्यात

 लाखो नागरिकांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या आरोपीला ठोकल्या रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या आरोपीसह केमिकल टॅंकर ताब्यात


शिरूर  (कटूसत्य वृत्त):- शिरूर तालुका येथील गणेगाव खालसा हद्दीतील कामिनी ओढ्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी केमिकल सोडल्याने ओढ्यातील पाणी दूषित झाले होते त्या केमिकल मुळे पाण्याचा रंग लालसर होऊन सदर पाण्यामुळे मानवी व प्राण्याचे जीवितास धोका निर्माण झालेला होता

सदर केमिकल युक्त पाणी कामिनी ओढ्यातून पुढे कोंढापुरी येथील तळ्याला मिळत असल्याने सदर प्रकरणांची पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती सदर घटनास्थळास मा सौ देवकाते प्रांताधिकारी तसेच  प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर श्री बाळासाहेब म्हस्के तहसीलदार  महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक रांजणगाव यांनी भेट देऊन पाहणी करून सदरचे पाणी कोंढापुरी तलाव मध्ये जाऊ नये यासाठीच्या उपाययोजना केल्या होत्या गणेगाव खालचा येथील ग्रामसेवक श्रीकांत सुखदेव वाव्हळ यांचे तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरच्या दूषित पाण्यामुळे ओढ्यातील वनस्पती मासे मरण पावले होते या गंभीर प्रकारामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये भीतीचे भया वह वातावरण तयार झाले होते 

 या घटनेचे गंभीर गांभीर्य लक्षात येताच पोलीस अधीक्षक पुणे यांनी उपविभागीय अधिकारी शिरूर व पोलीस निरीक्षक रांजणगाव पोलीस स्टेशन यांना सूचना देऊन  आरोपीचा शोध घेऊन प्रभावी कायदेशीर कारवाई करणे बाबत सूचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पुण्यातील आरोपीचा शोध घेणे कामे दोन वेगवेगळी पथके तयार केली होती खबरीच्या माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हामधील निष्पन्न आरोपी किशोर दशरथ मोरे वय 36 बेकराईनगर हडपसर हा पुणे रेल्वे स्टेशन येथून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीमध्ये असताना त्यास तपास पथकाने ताब्यात घेऊन 17/ 7 /2024 रोजी अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिरुर यांच्यासमोर हजर करून न्यायालयाने आरोपीची 20/7/2024 रोजेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे 

सदर गुन्हातील तपासामध्ये पोलीस यंत्रणेला असे निष्पन्न झाले की अटक आरोपी किशोर दशरथ मोरे यांनी त्यांच्याकडे टँकर क्र MH 04 HD 4530 यामध्ये रांजणगाव एमआयडीसी मधील नामांकित कंपनी मधून दिनांक 9/7/2024 रोजी 35 टन हायड्रोलिक ऍसिड भरून ते सुखा केमिकल कंपनी बडोदरा गुजरात येथे खाली करण्यासाठी भरले होते परंतु आरोपीने सदरचे केमिकल हे संबंधित कंपनीमध्ये खाली न करता गणेगाव हद्दीतील कामिनी ओढ्यातील पाण्यामध्ये सोडून दिले व सदरचे ऍसिड हे सुखा केमिकल कंपनीमध्ये जमा केल्याची बनावट पावती तयार करून संबंधित कंपनीत पाठवली होती त्यानुसार रांजणगाव पोलिसांनी सदर गुन्ह्यांमध्ये बनावटी चलन तयार करण्याचे काम या आरोपाखाली तसेच कलमांचा समावेश करून अजून या गुन्ह्यांमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का व आरोपीने असा प्रकार अजून कोठे केला आहे का याबाबतीत पुढील तपास चालू केला आहे 

 पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे सहा फौज दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ पो हवा विलास आंबेकर ब्रह्म पवार संदीप जगदाळे यांनी केला आहे याच गुन्ह्याचा पुढील चा अधिक तपास श्री नीलकंठ तिडके पोलीस उपनिरीक्षक रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करत असून या गुन्ह्यांमध्ये अधिक काही निष्पन्न होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

गणेगाव येथील ओढ्यातील पाण्यामध्ये घातक केमिकल सोडल्याने रांजणगाव शिक्रापूर सारख्या मोठ्या गावांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला होता असे भयानक कृत्य करणाऱ्या व्यक्तींना कायद्याच्या योग्य चौकटीत बसवून कठोरात कठोर शिक्षा व्हावी -

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages