मोडनिंब येथील वेदांग पाटीलची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड
मोडनिंब (कटूसत्य वृत्त):- अमरावती येथे १४ ते १७ जुलैमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये एकलव्य अकॅडमी मोडनिंब (ता.माढा) येथील सराव करत असलेल्या वेदांग प्रवीण पाटील याने कंपाउंड प्रकारात दहा वर्षांखालील गटामध्ये ३३६/३६० गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच, विजयवाडा आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये त्याची निवड झालेली आहे.यशस्वी खेळाडू पालक व मार्गदर्शक यांचा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, तसेच त्यांचे बंधू देविदास दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेदांगला व ईशानला प्रशिक्षक विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, सचिव हरिदास रणदिवे, उपाध्यक्ष भारत शिंदे, उद्योजक सतीश शहा,शिवप्रसाद पवार, सोपान मोहि संजय शिंदे व सावता घाडगे, डॉ.प्रवीण पाटील यांनी कौतुक केले.
0 Comments