अनुत्तीर्ण विद्यार्थी लटकले, कॅरीऑन साठी विद्यापीठाचा अभ्यास सुरू
त्यांच्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांनुसार सकारात्मक निर्णय कसा घेता येईल, याचा अभ्यास सुरू असून पुढील आठवड्यात यावरील अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार पदवीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी पहिल्या वर्षी नापास झाला तरी देखील त्या विद्यार्थ्यास द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. पण, तृतीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याला पहिल्या वर्षातील सर्वच विषयांत उत्तीर्ण होण्याचे बंधन आहे. पहिल्या वर्षातील सर्व विषय निघाल्यावरच त्याला तृतीय वर्षात प्रवेश मिळतो. या नियमामुळे अनेक विद्यार्थी द्वितीय वर्षात पास होऊनही पहिल्या वर्षातील काही विषयामुळे तिसऱ्या वर्षाला जाऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यांनी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्हाला तिसऱ्या वर्षात प्रवेश विद्यापीठाने द्यावा, अशी मागणी केली आहे.
विद्यापीठाने त्या मागणीनुसार समिती स्थापन करून त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे. या समितीचा अहवाल आला असून, त्यावरील अंतिम निर्णय आता ॲकॅडमिक कौन्सिलमध्ये होणार आहे. हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीचा अभ्यास सुरू आहे. कॅरीऑनसंबंधीचा निर्णय पदवीच्या सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे.
'एन-प्लस टू'तूनही विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी
पदवीचे शिक्षण घेताना अनेकजण तीन वर्षांच्या काळात पदवी पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण घेण्यास अडचणी येतात आणि त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यातूनच शिक्षण सोडून द्यावे लागते. त्यांच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यापूर्वी 'एन-प्लस टू'चा निर्णय घेतला आहे. तीन वर्षात पदवी पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन अतिरिक्त वर्षात पदवी पूर्ण करण्याची संधी दिली जाते.
0 Comments