Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा स्काऊट गाईडच्यावतीने पंढरपूरात महास्वच्छता अभियान

जिल्हा स्काऊट गाईडच्यावतीने पंढरपूरात महास्वच्छता अभियान

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर भारत स्काऊट गाईड शहर जिल्हा संस्था यांच्यातर्फे समुदाय विकास प्रकल्प अंतर्गत पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटामध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात पंढरपूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी लिगाडे, पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी वाळुजकर, आरोग्य अधिकारी तोडकर,महाराष्ट्र राज्याचे स्काऊट प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त शंकर यादव, जिल्हा संघटक श्रीधर मोरे, जिल्हा संघटक गाईड अनुसया शिरसाठ, रोवर लिडर प्रा. सुधाकर कांबळे व सर्व युनिट लीडरसह संपूर्ण जिल्ह्यातील २५ शाळेतून ७७० स्काऊट गाईड विद्यार्थी सहभाग घेतले. स्काऊट गाईडच्या  विद्यार्थ्यांनी चंद्रभागा वाळवंटातील आठ ते नऊ टन कचरा संकलित केले.संकलित कचरा पॉलिथिन पेपरमध्ये पॅक करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आले. 

             स्काऊट गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा स्काऊट आयुक्त तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप,जिल्हा गाईड आयुक्त तथा उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले ,जिल्हा कोषाध्यक्ष तथा लेखाधिकारी वैभव राऊत आदींनी उपस्थित स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सत्कृत्यातून समाधान 

             नुकतेच पंढरपूरात आषाढी एकादशी वारी झाली.भारतातून लाखो भाविक भक्त चंद्रभागेच्या तीरी आले होते.यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात केळीचे साल, निर्माल्य, प्लॅस्टिक पिशव्या,कागद, चिंध्या, फाटकी कपडे असा कचरा पडले होते. स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी स्वतः हून या समुदाय प्रकल्प अंतर्गत विठुरायाच्या चरणी सेवा केली. चांगले सत्कृत्य केल्याचे समाधान वाटले असे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त शंकर यादव यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments