Hot Posts

6/recent/ticker-posts

माना येथील रेशन दुकानदारांनी सकाळ संध्याकाळ नियमानुसार दुकान सुरू ठेवावे. गावकऱ्यांची मागणी..‌‌..!

माना येथील रेशन दुकानदारांनी सकाळ संध्याकाळ नियमानुसार दुकान सुरू ठेवावे. गावकऱ्यांची मागणी..‌‌..!

अकोला(कटूसत्य वृत्त ):-अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यातील ग्राम माना येथील चारही रेशन दुकानदारांनी रेशन दुकान हे नियमानुसार सकाळ व संध्याकाळ दोन टाईम सुरू ठेवावे. अशी मागणी माना येथील गावकऱ्यांनी केली आहे.

सविस्तर अशी की शेतीच्या कामासाठी लगबग सुरू झाली आहे. या अगोदर मजुरांच्या हाताला काम नव्हते. कसेबसे आता शेतीचे कामे लागले आहे. शेतकऱ्यांच्या मागे मात्र शेतीची पेरणी डवरणी इत्यादी कामात शेतकरी हा मग्न असून माना येथील सर्व रेशन दुकानदार मात्र सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंतच आपली दुकाने हे सुरू ठेवतात. मात्र बारा वाजले की साईट बंद झाली, मशीन बंद झाली, मशीन मध्ये बिघाड आहे, असे विविध कारणे सांगून सकाळपासून रांगेत लागलेल्या रेशन धारकांना वापस घरी पाठवतात. अगोदरच रेशन धारक हे सकाळपासून आपली मोलमजुरी पाडून रेशन घेण्याकरिता सकाळी सात वाजता पासून रांगेत राहतात. व रेशन  धारक हे त्यांच्या मनमानी कारभारामुळे विविध कारणे सांगून त्यांना घरी पाठवतात. रेशन धारकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. या रेशन धारकांच्या बाबीकडे या संबंधित प्रशासन मात्र अद्यापही गाठ झोपेत आहे आमच्या प्रतिनिधी  उद्धव कोकणे यांनी मुर्तीजापुर येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्राहकांनी तक्रार अर्ज तहसीलमध्ये दाखल करावा असे त्यांनी सांगितले.

तरी या सर्व बाबीचा प्रशासनाने विचार करून रेशनधारकांनी दोन टाईम आपले रेशन दुकान उघडे ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

सर्व रेशन दुकानदारांची रेशन धारकांनी या अगोदर तहसीलदार तक्रार केली नाही. जे रेशन धारक नियमानुसार दोन टाईम दुकान उघडे ठेवत नाही. अशांची तक्रार तहसील मूर्तिजापूर येथे नागरिकांनी करावी.

    तहसीलदार...... शिल्पा बोबडे.

Reactions

Post a Comment

0 Comments