Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील पहिल्या बसस्थानक कम यात्री निवासाचे पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, काय आहेत सुविधा

राज्यातील पहिल्या बसस्थानक कम यात्री निवासाचे पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, काय आहेत सुविधा 


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूरच्या आषाढी यात्रे निमित्ताने राज्यातील पहिल्या बसस्थानक कम यात्री निवासाचे पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.श्री क्षेत्र पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या जागेवर हे राज्यातील पहिले 34 फलाटाचे अति भव्य अशा चंद्रभागा यात्रा बसस्थानक आणि त्याला जोडूनच 1 हजार यात्रेकरू एकावेळी राहतील अशा यात्री निवासाचे लोकार्पण आषाढी एकादशी दिवशी (१७ जुलै) सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.


यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहणार आहेत.पंढरपूर येथे एसटी महामंडळाचे अद्यावत बस स्थानक आहे.या शेकडो बसेस राज्यभरात प्रवाशांची नियमित ने-आण करतात. तथापि, आषाढी आणि कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रेसाठी ते बसस्थानक अपुरे पडत होते. म्हणून एसटी महामंडळाकडून आपल्या 11 हेक्टर जागेवर 34 फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. याबरोबरच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंची निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे 1हजार यात्रेकरू राहू शकतात. येथे एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी 2 सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत. हा राज्यातील एसटी महामंडळाचा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी 33 कोटी रुपये खर्च आला आहे. या भव्य प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.


500 एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था या बस स्थानकावरून आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. येथे एसटीच्या सुमारे 500 कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली असून याबरोबरच सुमारे 1 हजार यात्रेकरू देखील राहतील, असे भव्य यात्री निवास बांधण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments