दि.१९ जुलै रोजी सकाळी ७:४५ वाजताची वैराग – पुणे एसटी बस झाली पलटी… - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 19, 2024

दि.१९ जुलै रोजी सकाळी ७:४५ वाजताची वैराग – पुणे एसटी बस झाली पलटी…

 दि.१९ जुलै रोजी सकाळी ७:४५ वाजताची वैराग – पुणे एसटी बस झाली पलटी…


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वैराग- पुणे एसटी बस क्रमांक एम.एच.१४ बी . टी. ०९७२ सदरची एसटी बस रोड वरून खाली घसरून पलटी झाली आहे. एसटी बसच्या चालकास हृदयविकारचा झटका आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पिंपळनेर या गावाजवळ ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान बस पलटी होऊन वैरागचे अनेक प्रवासी हे  जखमी झाले आहेत. 



सदर जखमींना कुर्डुवाडी इथल्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सदरच्या घटनेने आबालवृद्ध तसेच महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही काळाने इतर एसटी बसेस मागून प्रवाशांना इच्छितस्थळी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages