माढ्याच्या टेभुर्णीत लागले शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे भावी आमदार म्हणुन बॅनर,काॅग्रेस पक्षा च्या जिल्हा उपाध्यक्षाने लावला बॅनर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 19, 2024

माढ्याच्या टेभुर्णीत लागले शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे भावी आमदार म्हणुन बॅनर,काॅग्रेस पक्षा च्या जिल्हा उपाध्यक्षाने लावला बॅनर

माढ्याच्या टेभुर्णीत लागले शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे भावी आमदार म्हणुन बॅनर,काॅग्रेस पक्षा च्या जिल्हा उपाध्यक्षाने लावला बॅनर 

           माढा (कटुसत्य वृत्त): माढ्यातील टेभुर्णीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे माढ्याचे भावी आमदार म्हणुन बॅनर लागले आहेत. काॅग्रेस (आय) पक्षा चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पिंटु पाटील यांनी हा बॅनर लावला आहे.

           मविआ मधुन ही जागा शरद पवार गटाला जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.अश्यातच शरद पवार गटाकडुन उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांची भाऊ गर्दी झालेली असतानाच अश्यातच भावी आमदार म्हणुन शिवतेजसिंह मोहते पाटिल यांचे बॅनर लागलेत. त्यामुळे आता मविआ च्या शरद पवार गटा मध्ये माढ्याच्या उमेदवारीवरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

           शिवतेजसिंह हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत.तर शरद पवार गटातुन माढ्याचे खासदार झालेले धैर्यशिल मोहिते पाटील यांचे ते सख्खे चुलत बंधु आहेत.येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्शभुमिवर अनेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत.प्रत्येकजण आपल्यालाच उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत.

           लोकसभा निवडणुकी अगोदर संजय कोकाटे यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करीत शरद पवार गटात प्रवेश केला होता.त्यामुळे कोकाटे हे शिंदे गटाचे प्रमुख दावेदार मानले जाताहेत.तर मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते असलेले शिवाजी कांबळे,कृषी निष्ट परिवाराचे नितीन कापसे,संजय पाटील घाटणेकर यांचेसह काॅग्रेसच्या नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे या देखील तिकीटाचा शब्द जर मिळाला तर शरद पवार गटात जाण्याच्या पुर्ण तयारीत आहेत.तर सर्वात महत्वाचे म्हणजे माढ्याचे विदमान आमदार बबनराव शिंदे हे विकास निधी खेचुन आणण्यासाठी जनतेची रखडलेली कामे पुर्ण करण्यासाठी अजित पवार गटात जाऊन सत्तेत गेल्याचे सांगताहेत.त्यामुळे आमदार शिंदे यांनी देखील पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

           लोकसभा निवडणुक निकालानंतर बाळ दादा मोहिते पाटील यांनी माढा विधानसभेची उमेदवारी आमच्या कुटूंबात राहणार नाही तर ती कार्यकर्त्याला दिली जाणार असल्याचे म्हटलं होतं.आणी त्यातच आता शिवतेजसिंहाचे लागलेले बॅनर मुळे चर्चेचे पेव फुटले आहे.त्यामुळे माढ्याची तुतारी आता कुणाच्या हाती जाते ? हे पहावं लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages