बळीराजा हा खर्या अर्थाने जगाचा पोशिंदा असून जन्मभर आपण त्यांच्या
ऋणातून मुक्त होऊ शकत नाही- जिल्हाध्यक्ष संतोष पवार
शेतकरी बांधवांचा सन्मान करून राष्ट्रवादीने केला कृषी दिन साजरा ..
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-1 जुलै कृषि दिन हरित क्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांची जयंती दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या मदतीनं प्रगत व पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी झटणारे, कापूस एकाधिकार योजना, धवल क्रांती, 'पाणी अडवा, पाणी जिरवा' यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच आज कृषी दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्रर मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात कृषी दिंडी शेतकरी संवाद हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत तेथे उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा फेटा व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला त्यांना कृषिदिना'च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शुभेच्छा दिल्या.
बळीराजा हा खर्या अर्थाने जगाचा पोशिंदा असून त्यांच्या ऋणातून आपण जन्मभर मुक्त होऊ शकत नाही -जिल्हाध्यक्ष संतोष पवार
हा उपक्रम राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बंडगंची महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे विद्यार्थ्यी अध्यक्ष पवन पाटील यांनी आयोजित केला होता 26 जून रोजी छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे साहेब याच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचा सप्ताह उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आज करण्यात आला....
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,आनंद मुस्यारे सेवादल अध्यक्षप्रकाशजाधव,महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कस्पटे, युवक अध्यक्ष सुहास कदम , कार्याध्यक्ष तुषार जक्का, संघटक दत्तात्रय बडगंची,विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरु , कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, आशुतोष नाटकर
वाहतूक अध्यक्ष इरफान शेख, बाबू पटेल, अहमद मासूलदार, आयुब शेख, दीपक हिप्परगे, दशरथ शेंडगे, महेश कुलकर्णी,ओंकार हजारे ,महेश घोडके, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादी राजे, दक्षिण विधानसभा महीला अध्यक्ष प्रिया पवार, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष कांचन पवार,सुरेखा घाडगे, प्रतिमा चौगुले, नीता बिराजदार, प्रमिला स्वामी, भाग्यश्री राठोड,
सोशल मीडिया शहर -जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, शामराव गांगर्डे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:
Post a Comment