रात्रीच्या अंधारात फिरणाऱ्या ड्रोन बाबत नागरिकांमध्ये संभ्रम प्रशासनाकडून खुलासा करण्याची मागणी
नगर (कटूसत्य वृत्त):- अनेक दिवसांपासून शिरूर तालुका मधील बहुतांश गावामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरताना सर्वसामान्य नागरिकांना दिसत आहे नेमका हा प्रकार काय आहे या पाठीमागे हवाई दल याची काही यंत्रसामग्री आहे का किंवा चोरीच्या उद्देशाने आपल्या घराची कोणी पाहणी तर करत नाही ना अशा भयभीत अवस्थेमध्ये नागरिक दुहेरी संकटामध्ये सापडले आहे
रांजणगाव गणपती हद्दीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून रात्री आठ नंतर संशयतरित्या ड्रोन फिरताना दिसत आहेत सदर ड्रोन च्या माध्यमातून चोर वेगवेगळ्या घरांवरती टेहळणी करून चोरीच्या उद्देशाने काही ठिकाणी घुसून चोरीचे प्रकार निदर्शनास आले आहेत यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे ड्रोन चा बेकायदेशीर वापर करून दरोडा सारख्या घटना घडण्याची नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली आहे तरी संबंधित यंत्रणेची पाठपुरावा करून तात्काळ नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने प्रशासनाने आपली भूमिका जाहीर करावी किंवा ड्रोन बद्दल नागरिकांमध्ये पसरलेली भय काढून समजून सांगावे अशी नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे

No comments:
Post a Comment