जान्हवी फौंडेशन कडून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना निमित्त शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जान्हवी फौंडेशन गेली ९ वर्षे पुणे शहर, ग्रामीण परिसरात व्यसनमुक्तीवर काम करत आहे. २६ जुन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून जान्हवी फौंडेशनने व्यसन मुक्तीच्या विषयावर पोस्टर बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन शाळा, डॉ राजेंद्र प्रसाद मॉडेल स्कूल, बोपोडी या दोन शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या सर्व पोस्टरचे प्रदर्शन, बक्षीस वितरण हे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेमध्ये ठेवण्यात आले. जान्हवी फॉउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड, यांनी मुलांना अमली पदार्थांच्या सेवनातून होणाऱ्या शारीरिक, मानसिक आजारांची माहिती दिली, पुण्यात वाढत्या अमली पदार्थांचे सेवन आणि त्यातून होणाऱ्या गुन्हेगारी, अपघात या बद्धल सांगितले. तसेच जान्हवी फॉउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक सदाशिव कल्याणकर यांणी मुलांना त्यांच्या वयात चांगल्या, वाईट बाबी ची माहिती दिली, त्यांनी आपले आदर्श कोणाला बनवायचे हे सांगितले, हे वाढते वय वाईट गोष्टी कडे वळु नये या साठी आपले आदर्श, आपले भविष्य या बाबत मार्गदर्शन केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेचे मुख्यध्यापक जीवन कांबळे सर यांनी मुलांना व्यसन केल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला जान्हवी फौंडेशन चे विश्वास खरात, ओंकार साळुंखे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेचे वरिष्ठ शिक्षिका राजश्री मांढरे मॅडम, गणेश ढालपे सर, डॉ राजेंद्र प्रसाद मॉडेल स्कूलच्या शिक्षिका आरती कांबळे , मोनिका नरवडे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे , टोनसे पाई मॅनेजमेंट इन्स्टिटयूट बेंगलोर , सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे येथील विध्यार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा धारडे मॅडम यांनी केले.

No comments:
Post a Comment