बावी तुळशीसह बेंद ओढ्यात उजनीचे पाणी- सिंचन विभागाचा हिरवा कंदिल आ.दादा- मामा शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक- - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 26, 2024

बावी तुळशीसह बेंद ओढ्यात उजनीचे पाणी- सिंचन विभागाचा हिरवा कंदिल आ.दादा- मामा शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक-

 बावी तुळशीसह बेंद ओढ्यात उजनीचे पाणी- सिंचन विभागाचा हिरवा कंदिल

  आ.दादा- मामा शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक-

  पाण्यासाठी आमदारकी सोडण्याची केली होती भाषा ! 

 कुर्डूवाडी-(कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षापासून माढा तालुक्यातील बावी ,तुळशी, अंजनगाव तसेच करमाळा विधानसभेतील 36 गावांपैकी बेंद ओढ्यावर आधारित असलेली भोगेवाडी, पिंपळखुटे ,अंबड ,कुर्डू व त्याखालील गावांना उजनीचे पाणी बेंद ओढ्याच्या माध्यमातून मिळावे यासाठी उग्र आणि तीव्र स्वरूपात सर्वपक्षीय आंदोलने अनेक वेळा झाली होती . डझनभर नेत्यांनी कुर्डू मध्ये आंदोलनात येऊन आम्ही पाणी देणार अशी अश्वासने दिली . पण ती अश्वासने हवेतच राहिली.  अखेर बेंद ओढ्यात पाणी सोडण्याच्या मागणीला आ.संजयमामा शिंदे यांनी मागिल नागपुरच्या अधिवेशनात लक्षवेधी करित पाण्याचा प्रश्न गंभिर आहे असे सांगत सरकारला सावध केले होते. वेळोवेळी आ.सजयमामा शिंदे यांनी संबधीत विभागात मंत्री व प्रशासकिय अधिकाऱ्यांसमोरच बैठका लावल्या होत्या. अखेर काल सिंचनभवन मध्ये  झालेल्या बैठकीतुन आ.बबनदादा शिंदे व आ संजयमामा शिंदे बंधू यांनी पाणी सोडण्याचे पत्रच घेऊन आले. त्यानंतर सोशल माध्यमांतुन आ.शिंदे बंधुवर कौतुकाचा पाऊस बरसलेला पाहायला मिळाले.          

   आ.शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन देखील सरकारने पहिल्यांदा या मागणीकडे दुर्लक्ष केले होते.  परुंतू याचाच परिणाम झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाला.  गत लोकसभेत कुर्डू ग्रामपंचायतने निवडणुकीवरती बहिष्कार टाकला आणि बेंद ओढ्यात ऊजनीचे पाणी सोडण्याची मागणी तीव्र स्वरूपात पुढे आणली होती.   आ.संजयमामा शिंदे यांनी आमदारकी मिळताच सिंचन योजनांवर सुक्ष्म पणे काम करण्यास सुरवात केली होती. कुर्डू येथे मागिल विधानसभेच्या अखेरच्या सभेला संबोधित करताना आ. संजय शिंदे यांनी आपण जर पाणी नाही आणले तर आमदारकी सोडतो , परत मतं मागायला गावात दारात येणार नाही असा पण केला होता. अखेर आ. शिंदे यांनी बोललेला शब्द खरा करुन दाखवत बेंद ओढ्यात पाणी सोडण्याच्या मागणीला अडथळे आणणाऱ्या अनेकांना कात्रज चा घाट दाखवत कुर्डू व इतर गावांना दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे हा मोठा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.    

        आ.शिंदे यांचे बेंद ओढ्यानंतर लक्ष या योजनेवर

   करमाळा मतदार संघात गेल्या सत्तर वर्षातील योजना बंद पडल्या त्या अनेक योजना आ.शिंदे यांनी सुरू केल्या . संपादित जमिनी चा मोबदला लोकांना मिळवुन दिला .  रस्ते बांधणी किंवा अनेक विविध सार्वजनिक योजना राबवल्या . आमदार आपल्या दारी योजना राबवत गावातील समस्या गावातच सोडवली . बेंद ओढ्यात पाणी सोडण्याच्या निर्णयात अनेकांनी आडकाठी आणली होती अशा चर्चा होत असताना आ.शिंदे यांनी सिंचन भवनातुन हिरवा कंदिल आणल्याने विरोधकांना हा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.  बेंद ओढ्यानंतर आता करमाळ्यातील   कुकडी उजनी उपसा सिंचन , दहिगाव शिल्लक मधुन वडशिवणे रोपळे , मशेवाडी तलाव,  देवळाली , झरे,  मलवडी हिसरे ऊर्वरीत भाग व परिसर यां गावांना दहिगाव चे पाणी मिळवुन देण्याची शक्यता , करमाळ्याची प्रशासकीय इमारत 40 कोटी , करमाळा शहरला रस्ते 71 कोटी रूपए , कुर्डूवाडी न.पा पाणी पुरवठा 87 कोटी 52 लाख तांत्रिक मान्यता मिळाली असून , अधिवेशनात  निधी मिळेल . कुर्डूवाडी न.पा 118 कोटी प्रस्ताव , ऊजनी धरणातील वाशिंबे पोमलवाडी दोन मोठे ब्रीज ,ऊजनी पर्यटन 289 कोटी प्रस्ताव सादर केलेत. या योजनांमुळे करमाळ्यात आ शिंदे हे निधींचा पाऊस पाडतात की काय असे चित्र दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages