विद्या निकेतन प्रशालेत सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा
मसले चौधरी (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील जवाहर ग्रामविकास मंडळ वाळूज संचलित, विद्या निकेतन प्रशालेत छत्रपती शाहू महाराजांची 150 वी जयंती "सामाजिक न्याय दिन"म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव सर हे उपस्थित होते.छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन इंग्रजी विषयाचे शिक्षक मा. कांत हजारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवानंद बोधले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची ओळख आपल्या मनोगतातून करून दिली. तसेच अनुष्का भोसले, गौरी शिंदे, वैभवी सिरसट व गौरी भोसले या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून राजांचा जीवनपट सांगितला.
त्यानंतर सौ. कांचन पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने व उत्साहाने सामाजिक न्याय दिन साजरा केला . यावेळी प्रशालेतील जेष्ठ शिक्षक रावसाहेब पाटील सर, . रविकांत साबळे सर, सौ. अंजना पोटरे शहाजी आतकरे तसेच संतोष वाघमोडे व गोविंद जांभळे हे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment