विद्यार्थी परिषदेवर नऊ विद्यार्थ्यांची बिनविरोध निवड
नाशिक (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात अधिसभा व विद्यापीठ अधिसभा व विद्यार्थी परिषदेवर निवड झालेल्या पदाधिकाÚयांचे विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी अभिनंदन केले.
यावेळी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित पदाधिकाÚयांना विद्यापीठातर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थी हा
विद्यापीठाचा केंद्रबिंदु आहे. विद्यापीठोच विविध उपक्रम व योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे व समन्वयासाठी विद्यार्थी प्रतिनिधींनी जबाबदारीने काम करावे. प्रशासन व विद्यार्थी यांच्यात समन्वय रहावा यासाठी कार्य करावे.विद्यार्थ्यांच्या अडचणी व प्रश्न विहित मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे त्यांनी सांगितले.
याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 कलम 23(2)(टी) नुसार विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडुन देण्याची तरतूद आहे. त्यानुसार अमरावतीचे विदर्भ आयुर्वेद कॉलेज येथील इप्पर ऋषिकेश बालाजी, नाशिक येथील आयुर्वेद
सेवा संघाचे आयुर्वेद महाविद्यालय येथील राठोड सदाकांत लक्ष्मण व कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय येथील हिरगुडे श्रीतेज शिवप्रसाद या तीन सदस्यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 अन्वये विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडून देण्याची तरतूद आहे. यानुसार विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी नगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे आयुर्वेदिक महाविद्यालयाचा मडके धनंजय दत्तात्रय यांची बिनविरोध
निवड झाली आहे.
उपाध्यक्ष पदाकरीता नंदुरबारचे के.डी. गावीत कॉलेज ऑफ बी.एस्सी नर्सिंगचा धमके अभिषेक सुनिल, छत्रपती संभाजी नगर येथील आनंद कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथील मेश्राम चैतन्य गंगाधर तसेच सचिव पदाकरीता पुण्याचे श्रीमती बकुळ तांबट इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंग एज्युकेशन येथील दुर्गडे नेहा चंद्रकांत यांची व सहसचिव पदाकरीता छत्रपती संभाजी नगर येथील दक्षिण केसरी मुनी मिश्रीलालजी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज येथील इप्पर स्नेहा बाळू आणि सेवाग्राम येथील महात्मा गांधी मेडिकल सायन्सेस मेडिकल कॉलेज येथील क्षीरसागर दत्तात्रय बन्सीधर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र गाळ यांनी नवनिर्वाचित नावांची घोषणा केली. यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, उपकुलसचिव डॉ. नितीन कावेडे, बाळासाहेब पेंढारकर उपस्थित होते. विद्यापीठ अधिसभा व विद्यार्थी परिषद निवड प्रक्रियेकरीता श्री. सुशिलकुमार ठाकूर, श्रीमती रंजना देशमुख, श्रीमती रेखा करवल, श्री. अविनाश सोनवणे, श्री. अर्जुन नागलोथ, घनःशाम धनगर, श्री. सुनील पुजारी यांनी परिश्रम घेतले. विद्यापीठ अधिसभा व विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित सदस्यांचे विद्यापीठ
परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
.jpeg)
No comments:
Post a Comment