सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात सुटावेत यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, ग्रंथालय संचालनालय यांना निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 29, 2024

सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात सुटावेत यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, ग्रंथालय संचालनालय यांना निवेदन

 सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात सुटावेत यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, ग्रंथालय संचालनालय यांना निवेदन


धुळे (कटूसत्य वृत्त):-धुळे सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात सुटावेत यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, ग्रंथालय संचालनालय यांना निवेदन देण्यात आले.. महाराष्ट्रात गाव तेथे ग्रंथालय योजना सुरू करून वाचन चळवळ सक्षम करण्याचा शासनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. अमेरिका सारख्या प्रगतिशील देशाने वर्ल्ड नॉलेज सेंटर (श्रळलीरी) प्राधान्य देऊन विकास घडवून आणला. आपल्या देशात वाचन चळवळ सक्षम होणे काळजी गरज आहे. आज महाराष्ट्रात साधारणतः ११३०० शासनमान्य ग्रंथालय आहेत. महागाईचा चढता आलेख बघता सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रलंबित प्रश्न सुटणे गरजेचे आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या प्रमुख मागण्या १) विद्यमानशासनाने ६० टक्के अनुदान वाढ केली त्याबद्दल शासनाचे अभिनंदन व आभार उर्वरित ४० टक्के अनुदान त्वरित मिळावे. २) सार्वजनिक ग्रंथालयांचे वर्ग व दर्जा वाढ करण्यात यावी. ३) सार्वजनिक ग्रंथालयांना तिप्पट अनुदान वाढ करण्यात यावी  ४) सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी व सेवा शर्ती लागू करण्यात याव्यात. ५ ) नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात यावी. ६) राज्य ग्रंथालय संघ, विभाग ग्रंथालय संघ, जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या अनुदानात वाढ करण्यात यावी. ७) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम सुधारणा विधेयक येत्या विधिमंडळ अधिवेशनातमंजूर  करण्यात यावे ८) ग्रंथालय संचालनालय पाटील, ग्रंथालय संचालनालय मराठी भाषा विभागाकडे महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलेत. हस्तांतरित करण्याबाबतचा निर्णय रद्द करण्यात यावा ९) आर आर एल एफ कलकत्ता यांचा निधी तात्काळ मंजूर व्हावा १०) ग्रंथमित्र बांधवांना शासन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ११) महाराष्ट्रातील अ वर्ग व वर्ग ग्रंथालयांना ई ग्रंथालय प्रणाली उपलब्ध करून द्यावी १२) शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विनामूल्य शासकीय भूखंड उपलब्ध करून द्यावा.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले

यावेळी महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रमुख मागणी बाबत निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी, प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे, कार्योपाध्यक्ष डॉ. राजशेखर बालेकर, कोषाध्यक्ष एडवोकेट प्रवीण पाटील, छत्रपती संभाजी नगर जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव गुलाबराव मगर, जालना जिल्हा ग्रंथालय असोसिएशनचे अध्यक्ष डी.बी. देशपांडे उपस्थित होते. मा. अशोक गाडेकर साहेब यांची प्र. ग्रंथालय संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथालय संचालनालायतर्फे ग्रंथालय संचालय  अशोक गाडेकर यांनी राज्य पदाधिकारी यांचे पुस्तक देऊन स्वागत केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages