राजर्षी शाहूमहाराज जन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादीचे सामाजिक उपक्रम..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेचा वारसा जोपासत रयतेचे राज्य निर्माण करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची "१५० वी जयंती" दिनांक २६ जून २०२४ रोजी साजरी करीत आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमच शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासणारा पक्ष आहे. या युगपुरुषांचे सामाजिक सलोखा आणि लोकशाहीवादी विचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मूळ मंत्र आहे. याच विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १५० वा जन्मोत्सव दिनांक २६ जून २०२४ ते ०१ जुलै २०२४ (कृषि दिन) दरम्यान राज्यभरात साजरा करणार आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक सलोख्याचे विचार, त्यांचे शेती, कला-क्रीडा, साहित्य, शिक्षण, उद्योग, रोजगार, अंधश्रद्धा व अस्पृश्यता निर्मूलन या क्षेत्रातील बहुमोल योगदान नव्या पिढीला अवगत व्हावे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हेतू आहे. त्यामुळे प्रदेश स्तरावरून दिनांक २६ जून २०२४ ते ०१ जुलै २०२४ दरम्यानचा कार्यक्रमाचे परिपत्रक काढून सुचना केल्या आहेत
"सामाजिक सुधारणा आणि सामाजिक सलोखा हीच खरी देशसेवा" हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून आपण सर्वांनीच या कार्यक्रमाचे आयोजन/नियोजन करून जनतेच्या समोर आपल्या युगपुरुषाचा वारसा अधोरेखित करावा, असे आवाहन देखिल प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे साहेब यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप
1) 26 जून छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
2) राजर्षी छत्रपती शाहू महाराज "सामाजिक सलोखा परिषद" दि. ३० जून २०२४
स्थळ :- माणगाव, जिल्हा रायगड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे अभ्यासक, व्याख्याते व विचारवंत यांचा सहभाग असेल. हा कार्यक्रम पूर्णतः अराजकीय स्वरूपात राहील
3) कृषी दिंडी :- 30 जून
स्वरूपः- कृषि उत्पन्न बाजार समिती पर्यंत दिंडी काढावी व शेतकऱ्यांशी संवाद साधावा नियोजन/जबाबदारी - युवक आघाडी सोबत महिला आघाडी आणि विद्यार्थ्यी आघाडी
4)समारोप :- दिनांक ०१ जुलै २०२४ कृषि दिन हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून.
स्वरूपः- कृषि विद्यापीठे व कृषि महाविद्यालये यामध्ये "तंत्रज्ञान युक्त शेती" या विषयावर परिसंवाद नियोजन/जबाबदारी :- विद्यार्थी, युवक व महिला आघाडी.
याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी देऊन पक्षाची पेरंट बॉडी, फ्रंटल व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीतील सदस्य, आजी-माजी नगरसेवक प्रमुख मान्यवर या सर्वांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन केले ...
या बैठकीस जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे श्रीनिवास कोंडी बिज्जु प्रधाने अनिल उकरंडे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवक अध्यक्ष सुहास कदम प्रकाश जाधव तुषार जक्का बसवराज कोळी इरफान शेख महेश कुलकर्णी ओंकार हजारे अनिल छत्रबंध अनिल बनसोडे अलमेराज आबादीराजे रुपेश भोसले रमिज कारभारी प्रकाश मोठे दत्ता वाघमोडे शामराव गांगर्डे डॉ संदीप माने आशुतोष नाटकर दत्ता बडगंची अर्जुन माळी प्रज्ञासागर गायकवाड अजिंक्य उप्पिन राजू बेळ्ळेनवरू शरद गायकवाड राजू फटफटवाले राजेश जमादार गोपाळ दोडमणी वैभव गंगणे सोमनाथ शिंदे
महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर युवती अध्यक्ष किरण माशाळकर प्रिया पवार कांचन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते ...

No comments:
Post a Comment