Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकसंख्येपेक्षा जास्त झालेल्या लसीकरणाची चौकशी करून पिंपळे यांच्यावर कारवाई करा :छावा संघटना

 लोकसंख्येपेक्षा जास्त झालेल्या लसीकरणाची चौकशी करून पिंपळे

 यांच्यावर कारवाई करा :छावा संघटना

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्ह्यात काही तालुके हे त्यांच्या असलेल्या लोकसंखेपेक्षा अधिकाचे लासिकरणाचे काम करत आहेत. काम १०० टक्के पेक्षा आधिक होणे हे अभिमानास्पद असले तरी, मुळात लोकसंखेवर आधारित निर्देशांकपेक्षा काम अधिक असणे याचा अर्थ सदर अहवाल खोटा व दिशाभूल करणार असतो. सोलापूर जिल्ह्याचे माता बाल संगोपन अधिकारी   या नात्याने सन २०१७ पासून डॉ. अनिरुद्ध नंदकूमार  पिंपळे   यांनी याबाबत कोणतेही शहनिशा केली नाही. विशेषता अक्कलकोट तालुका हा दरवर्षी ११०/१२० टक्के लासिकरणाचे काम दाखवितो. परंतु तेवढे काम होणे करीत तेवढी लस उपलब्ध होती का? तेवढे लाभार्थी उपलब्ध होते का? याबाबत कोणतीही खात्री डॉ. अनिरुद्ध नंदकूमार  पिंपळे   यांनी आज पर्यन्त केलेली नाही. अक्कलकोट तालुक्यातील आधिकारी व कर्मचारी यांचे डॉ. अनिरुद्ध नंदकूमार  पिंपळे  यांचे अर्थपूर्ण सोहार्दाचे व जवळचे सबंध आहेत. या जवळकीच्या सबंधांमुळे तेथील आर्थिक गैर व्यवहारा सकट सर्वच बाबी वर पांघरून घालण्याचे काम डॉ. अनिरुद्ध नंदकूमार  पिंपळे;  सध्या निलंबित असलेले  तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव यांच्या मदतीने करत होते. तरी वरिल प्रकरणाची व खोट्या लसीकरणाची चौकशी करून पिंपळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी छावाचे दक्षिण तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments