अनेमिया फ्री इंडिया फोरमच्या प्रवीण प्रशिक्षकांना मिळाले प्रशिक्षण
अनेमिया मुक्त गावांचा गौरव
मुंबई(कटूसत्य वृत्त):- अनेमिया फ्री इंडिया फोरम (AFIF) या चळवळीतील प्राविण्य मिळविलेल्या महाराष्ट्र राज्यासह देशातील प्रशिक्षकांचे दि सहायक ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने तीन दिवसीय मास्टर ट्रेनिंग (रेफरेशर प्रशिक्षण) वर्धा येथे पार पडले.
या तीन दिवसीय प्रशिक्षणात दि सहाय्यक ट्रस्टचे संचालक राजेश के.आर., कार्यक्रम समन्वयक प्रमोद शिंदे, पियुष सोनी, पोषण आहार तज्ञ आरती जैन, प्रशिक्षक आतिश गायकवाड व अमन व्यास यांनी विविध विषयांवर प्रशिक्षण दिले. यामध्ये आरोग्य, अनेमिया, पोषण, आहार व परसबाग निर्मितीच्या माहिती व तांत्रिक पद्धतीमध्ये झालेल्या काही सुधारणा प्रशिक्षकांना सांगण्यात आल्या. जुन्या नव्या सर्व प्रशिक्षकांनी एकमेकांशी भेटून ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी काही अडचणी असतील तर त्यावर मात कशी करायची यावर चर्चा केली. नविन जैविक खते, मायक्रोग्रीन व अर्बन किचन गार्डन तसेच अनेमिया मुक्त गांव करणेसाठी प्रोजेक्ट प्रपोसल व बजेट लेखन ही शिकवण्यात आले.
शहरी पोषण परसबाग कशी करावी?, जेवणातील अँटी ऑक्सिडेंट काय आहेत, ज्यामुळे आहार पूर्ण असूनही शरीराला लागत नाही, संस्था बळकटीसाठी पद्धती, संवाद कौशल्यामध्ये (वेगवेगळ्या वयोगटातील सहभागीना कसे प्रशिक्षण देणार? आदी विषयांवर प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रमाणित प्रशिक्षक म्हणून काही फील्डवर अप्रतिम कार्य करणाऱ्या प्रशिक्षकाना प्रमाणित प्रशिक्षक म्हणून घोषित करण्यात आले. या प्रशिक्षणास महाराष्ट्र राजस्थान तसेच मध्य प्रदेश राज्यातून 23 प्रवीण प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता.
अनेमिया फ्री इंडिया फोरमच्या माध्यमातून विविध घटकांसोबत सेंद्रिय पोषण परस बागेसह अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेमिया मुक्त गावकरणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्याचा निर्णय दि सहाय्यक ट्रस्ट, मुंबई यांनी घेतला आहे. संस्थांना प्रथम क्रमांक - 51000 रुपये , द्वितीय क्रमांक - 31000 रुपये, तृतीय क्रमांक - 21000 रूपये चे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
.jpg)
0 Comments