वाशिंबेत उद्या नुतन खासदार मोहिते-पाटील यांचा गाव भेट दौरा
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघातून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे.यात करमाळा तालुक्याने तब्बल ४१ हजाराचं मताधिक्य दिले आहे.माजी आमदार नारायण पाटील यांचे मोठे योगदान आहे.तालुक्यातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी मोहिते-पाटील हे दि.२० जून रोजी करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.वाशिंबे येथे सकाळी ११ वाजता करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ झोळ यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता संवाद मेळावात पंचकोशितील शेतकऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा सत्कार केला जाणार आहे.यावेळी माजी आमदार नारायण पाटील यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

No comments:
Post a Comment