शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू; विनामूल्य राहण्या-खाण्याची सोय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 20, 2024

शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू; विनामूल्य राहण्या-खाण्याची सोय

 शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू; 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मुलांचे १ व मुलींचे १ अशी दोन शासकीय वसतिगृह कार्यान्वित करण्यात आली आहेत. या वसतिगृहामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत निवासाची सोय केली जाणार असून, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शासनाकडून थेट निर्वाह भत्ता अनुदान वितरित केले जाणार आहे. दरम्यान, वसतिगृहात सन २०२४-२५ या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने सुरु आहे 

शासकीयमुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये विजाभज, विमाप्र, इमाव, अनाथ व दिव्यांग या प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ३० टक्के जागेवर विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वसतिगृहांची प्रति वसतिगृह १०० एवढी विद्यार्थी क्षमता आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ३ बी / १, अ/३२, राघवेंद्रनगर, सूर्या हॉटेलजवळ, राघवेंद्र स्वामी मठाच्या पाठीमागे मुरारजी पेठ, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक मनिषा फुले यांनी केले आहे...

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages