एसटी प्रशासनाकडून शाळा तेथे एसटीचा पास ही योजना जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 20, 2024

एसटी प्रशासनाकडून शाळा तेथे एसटीचा पास ही योजना जाहीर

एसटी प्रशासनाकडून शाळा तेथे एसटीचा पास ही योजना जाहीर


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-रस्ता तेथे एसटी, प्रवाशांच्या सोयीसाठी असे ब्रीद वाक्य असणारे एस.टी. ब्रीद वाक्याप्रमाणेच प्रवाशांना सेवा देत आहे.गावखेड्यात अजूनही प्रवासी एसटी बसवर अवलंबून आहेत. यामुळेच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आता जागतिक पातळीवर नाव कमवत आहेत. यामुळेच एसटीचे पासेस काढताना ग्रामीण भागातील विद्यार्थांना रांगेत थांबावे लागू नये यासाठी एसटी प्रशासनाकडून शाळा तेथे एसटीचा पास ही योजना जाहीर केली. यानुसार सोलापुरातील अधिकारी कामाला लागले आहेत. यासाठी १२ जणांची टीम कार्यरत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काही लहान गावांत शाळेत जाण्यासाठी एसटी बसशिवाय कोणताच पर्याय नसतो. 'लालपरी'ने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटी बसचा पास मिळावा यासाठी योजना आखली आहे. यानुसार शहरातील व शहरानजीक असलेल्या शाळांची यादी तयार करण्यात आली आहे.

यानुसार शाळा निवडक कर्मचाऱ्यांना यासाठी कामाला लावण्यात आले आहे. यासाठी आगारात सहा टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममधून विविध शाळेला भेट देऊन त्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे पासेस देतील...

शंकरराव पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना एसटीचे पास वितरित करण्यात आले. यावेळी एसटीचे सहायक व्यवस्थापक जाधव व शिक्षकवृंद.पाससाठी फक्त दोन कागदपत्रे

■ एसटीचा पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना बोनाफाईड आणि दोन फोटो एवढी दोनच कागदपत्रे लागतात. सेवेसाठी एस टी महाराष्ट्र राज्य परिवहन जय महाराष्ट्र सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेतच पास मिळावे यासाठी आम्ही शाळा व महिावद्यालयात जाऊन पास वितरित करत आहोत. आम्ही शाळा व महाविद्यालयाच्या याद्या तयार केल्या आहेत. यासाठी आम्ही मुख्याध्यापकांशी संपर्क साधत आहोत. शिवाय विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क करावा.- उत्तम जुंधळे, आगार व्यवस्थापक

एसटी स्थानकात गर्दी झाली कमी

■ विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसस्थानकावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते. यापुढे पास घेण्यासाठी बसस्थानकावर जाण्याची किंवा रांग लावण्याची गरज नाही. शाळा किंवा महाविद्यालयाने दिलेल्या यादीनुसार एसटी कर्मचारी यांच्यामार्फत त्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना थेट शाळेमध्ये येऊन पास वितरित केले जाणार आहेत. जेणेकरून विद्यार्थांचा वेळही वाया जाणार नाही. ही योजना दि. १८ जूनपासून एसटी प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. विद्यार्थिनींसाठी महामंडळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत पास देत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages