राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून होणार सुरु - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 7, 2024

राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून होणार सुरु

राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून होणार सुरु



मुंबई (कटूसत्य वृत्त):- लोकसभा निवडणुकीची धामधुम अद्यापही सुरु आहे. निकालामुळे एकीकडे नाराजी तर दुसरीकडे आनंदोत्सव साजरा होत आहे.

दरम्यान, राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाबाबत घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या 27 जून रोजी पार पडणार आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 10 जून रोजी होणार होते. मात्र अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तारीखबाबत निर्णय घेण्यात आला असून अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. आता पावसाळी अधिवेशन हे येत्या 27 जून रोजी पार पडणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. यामध्ये चारा छावणी व पाणी टंचाई यावर देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी ताताडीने काही सूचना दिल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीबाबत अधिकची माहिती दिली. प्रशासन दुष्काळाकडे काळजीने आणि तातडीने लक्ष घालत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages