Hot Posts

6/recent/ticker-posts

पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन सोहळ्याचे आयोजन,/

 पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन सोहळ्याचे आयोजन,

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):-मंगळवेढा येथे रविवार दिनांक 2/6/20024 रोजी सकाळी 10 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय किल्ला भाग मंगळवेढा येथे पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे

पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन या सोहळ्यानिमित्त सुजित कुमार कांबळे यांचा एकांकिका संग्रह यश बळी संतोष रायबान यांचा कवितासंग्रह ऑलकाळजाची तसेच धनंजय माळी यांचा वात्रटिका संग्रह वाकल्या व विद्या माने यांचा कविता संग्रह प्रकाश विद्येचे चांदणे हेमंत रत्नपारखी यांचा गझल हा खेळ नव्हे शब्दाचा या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर उपस्थित कवीचे कवी संमेलन होणार आहे

या कार्यक्रमासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे माजी आमदार प्रशांतराव परिचारक  प्रा शिवाजीराव काळुंखे सर एडवोकेट नंदकुमार पवार स्मिताताई पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे तर विजय खाडे सोलापूर विजय काकडे बारामती डॉक्टर अरुण शिंदे कोल्हापूर सचिन कुलकर्णी पंढरपूर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे

तरी या कार्यक्रमात सर्व साहित्यप्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे शब्द सुमनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत रत्न पारखी यांनी सांगितले आहे

Reactions

Post a Comment

0 Comments