सुज्ञ सोलापूरकरांना नमस्कार.... ॲड. अंबरीश खोले यांची पोस्ट व्हायरल

आपला विकास जो २०१४च्या निवडणूकीत हरवला आहे त्याला आता शोधून बाहेर आणणे गरजेचे बनलेले आहे.
२०१४ साली आपण एक नवा विचार म्हणून मोदींना स्विकारले. पण आपला भ्रमनिरास झाला. वास्तविक विकास होईल अशा भ्रामक कल्पनांच्या आश्वासनाकडे आपण भुललात. पण हाती फक्त मातीच आली.
आज पाशवी बहुमताच्या जोरावर काळा पैसा भारतात परत आणून गरीबांना वाटण्याच्या वल्गना झाल्या परंतु प्रत्यक्षात सामान्य नागरिकांनी त्यांच्या उत्पन्नातून काही रक्कम बचत केली ती नोट बंदीच्या रूपाने या साहेबांनी बाहेर काढली. छोटा व्यापारी यात पार लयाला गेला. इथे मी unaccounted money कमवणार्याचे समर्थन करत नाही. पण सामान्य नागरिकांची ससेहोलपट लिहीत आहे.
जिएसटी आणून तर कहरच केला. शेतकरी, व्यापारी चित मेले. बळजबरीने वसुली सुरू झाली आणि ती केंद्राकडे घेऊन राज्याला परतावा त्या त्या अनुषंगाने न देता राजकारण सुरू केले.
कर्णानंतर कुणी मैत्री जपली असेल तर ती यांनीच. फक्त अदानी आणि अंबानी यांनाच देश वाटुन दिलाय. २०१४ च्या निवडणूकीचा खर्च सोसला म्हणून...
दहा वर्षापूर्वी आपल्या कडे दोन दिवसांनी पाणी यायचं आता चार दिवसांनी येतं हि यांची विकास नीती. टेक्सटाइल पार्क हवेतच. विमानतळ स्वप्नातच.
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ अनियंत्रित. मग फक्त राममंदिर हाच यांचा विकास म्हणायचा का?
राममंदिर प्रश्न न्यायालयात तडजोडीने सुटला. जे मुळ स्थान म्हणून आपण ऐकतो तिथे मंदिर झालेलं नाही असं काही जणांचे म्हणणे आहे आणि रामाचं नाव घ्यायची यांची लायकी पण नाही. मी हिंदु आहे रामभक्त आहे. रामरक्षा हनुमान चालीसा मुखोद्गत आहे पण तो माझा व्यक्तीगत श्रद्धेचा विषय आहे.. मी त्याचे प्रदर्शन का करावे.
देशाच्या संविधानात समानता, धर्म निरपेक्षता सांगितले आहे मग कशाला पदावर राहुन सार्वजनिक रित्या मुस्लिम द्वेष पसरवायचा. ते ही नागरिक आहेत. त्यापैकी काही कुटुंब देशसेवेसाठी शहीद झाले आहेत. कुर्बान हुसेन सोलापूर चे हुतात्मा आहेत. त्यामुळे सजग नागरिकांनी या बाबी दुर्लक्षीत करून लादलेल्या उमेदवारा ऐवजी योग्य लायक अशा स्थानिक उमेदवार ज्यांना इथल्या प्रश्नांची जाण आहे त्यांना मतदान करा. जास्तीत जास्त मतदान करा....
पार्सल माघारी पाठवा..
0 Comments