Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकशाहीच्या संवर्धनासाठी जनता मतदान करतील - कॉ. नरसय्या आडम मास्तर

 लोकशाहीच्या संवर्धनासाठी जनता मतदान करतील - कॉ. नरसय्या आडम मास्तर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकशाहीच्या संवर्धनासाठी जनता आज मतदान करतील.देश, देव आणि धर्माच्या नावावर गलिच्छ राजकारण करून लोकांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव करून इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारेल. देशातील वातावरण बदलेले असून घाबरलेले भाजप अब की बार चारसो पार ही खोटी आणि फसवी घोषणा करून स्वतःचा बचाव करत आहेत.याला जनता मतपेटीतून आपला रोष व्यक्त करतील.अशी प्रतिक्रिया माकप चे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले. 

आज सकाळी ठीक 8:15  वाजता माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर हे आपल्या परिवारासह बापूजी नगर येथील ज्ञानसागर प्रशाला येथे त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कॉ. कामिनी आडम, मुलगा डॉ.किरण आडम , मुलगी डॉ.निलीमा आडम आदींनी मतदानाचा हक्क बजावले.

Reactions

Post a Comment

0 Comments