Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यातील वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तहसीलदार यांना निवेदन

 मोहोळ तालुक्यातील वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  तहसीलदार यांना निवेदन 

   मोहोळ(कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ यांच्या वतीने सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदार सचिन मुळीक यांना निवेदन देण्यात आले.

        मोहोळ तालुक्यात वादळी  पावसामुळे अनेक घराची पडझड झाली असून पत्रे उडून गेले आहेत,फळबागा  केळी द्राक्ष डाळिंब आधी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पॉली हाऊस वादळी वाऱ्याने जमीन दोस्त झाले असून,पॉलिहाऊस मध्ये असलेली पिके,रोपे यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,जनावरांची पत्रा शेड उडून गेल्याने अनेक जनावरे जखमी व मृत्युमुखी पडली आहे तरी वरील बाबींचा सहानभूतीपूर्वक विचार करून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसान झालेल्या नुकसानीच्या पटीत तातडीने नुकसान भरपाई मिळावी.

       तसेच ज्यांची घरे पडली आहेत असे जे घरकुल प्रतीक्षा यादीत आहेत त्यांना घरकुलाचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांनी फळ पिक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना या मान्सूनपूर्व वादळी पावसाचा फटका बसला आहे त्यांना विनाअट पिक विमा देखील मंजूर करावा आधी मागण्याची निवेदन माननीय तहसीलदार यांना देण्यात आले.


याप्रसंगी सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे, रामदास भाई चवरे,भारत भाऊ सुतकर,नागेश साठे, प्रशांत बचूटे, प्रमोद डोके,शुभांगी लंबे,सिंधुताई वाघमारे,यशोदा ताई कांबळे,सुरेखा बाबर,स्मिता कोकणे, कल्पना खंदारे,मोहन होनमाने, शाहीर खांडेकर, विकास कोकाटे, बाळासाहेब डोंगरे, नागेश बिराजदार, पोपट जाधव,शशिकांत वागज, शरद गोडसे, मुकेश बचूटे, विजय भांगे,गौतम क्षीरसागर, राजेश सुतार, पोपट भुसे, अझरुद्दीन  शेख, जावेद बागवान, शाहीर सलगर, बाळासाहेब गायकवाड,राजशेखर घोंगडे,सुदर्शन कादे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments