Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळच्या शिवाली कुंभार ची इंटरनॅशनल व्हॉलीबॉल कॅम्प साठी निवड

 मोहोळच्या शिवाली कुंभार ची इंटरनॅशनल व्हॉलीबॉल कॅम्प साठी निवड

मोहोळ(कटूसत्य वृत्त):-मोहोळच्या शिवाली कुंभार ची इंटरनॅशनल व्हॉलीबॉल कॅम्प साठी निवड त्याबद्दल तिचा सत्कार    नागनाथ विद्यालय मोहोळ येथे संपन्न झाला असून प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान उपप्राचार्य प्रकाशजी शिंदे ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ राजमाने जेष्ठ कलाशिक्षक दिलीप कुमार दीक्षित नीलकंठ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान म्हणाले की आमच्या प्रशाले मधून घडलेले विद्यार्थी हे मोहोळ तालुका नव्हे तर देशाचे नेतृत्व करण्याची कला त्यांच्या अंगी येथील सर्व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ हे यामधून दिसून येते यावेळी प्रकाश शिंदे सर यांचेही मनोगत या व्यक्त झाली यावेळी ते म्हणाले की गुणवंत बरोबरच क्रीडाक्षेत्र ही खूप मोलाचे आहे यामुळे आपल्या विद्यालयातील विद्यार्थी व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी घडत असून त्यामधून आपल्या पाल्याचा व शाळेतील शिक्षकांचा अभिमान वाटेल असे कार्य या विद्यार्थ्यांच्या हातून घडत असून त्यांच्या पुढील कार्यास सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या 

          दिनांक 1/5/2024 रोजी बेंगलोर येथे आशियाई व्हॉलीबॉल U 20 गर्ल कॅम्प साठी 31 मुलींची निवड करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातून तीन मुलींची निवड झाली यापैकी शिवाली संजय कुंभार एक नागनाथ विद्यालय मोहोळची राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू होय यापूर्वी तिने 14 वर्षाखाली शालेय राष्ट्रीय स्पर्धा खेळली तसेच 2023 मध्ये19 वर्षीय  गटातून राष्ट्रीय स्पर्धा मध्ये भारतात दुसरा नंबर मिळवला होता सध्या ती  भारतीय विद्यापीठ पुणे येथे शिक्षण घेत आहे तिला मोहोळ तालुका वॉलीबॉल असोसिएशन प्राध्यापक संभाजी चव्हाण, समीर शेख, आबाराव गावडे  संतोष सीताप जिल्हा संघटनेचे सचिव सुदेश मालक, आंतरराष्ट्रीय रेफ्री अनिल गिराम, आणि अनिल  यरगर गुरव सर मार्गदर्शन लाभले तिच्या मोठ्या यशाबद्दल ग्रामीण भागात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments