Hot Posts

6/recent/ticker-posts

"वालचंद कॉलेजची उज्वल यशाची परंपरा कायम "

 "वालचंद कॉलेजची  उज्वल यशाची परंपरा कायम  "


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाने, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या, एच. एस. सी. बोर्ड परीक्षेत  उज्वल  यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. महाविद्यालयातील "विज्ञान" विभागाचा एकूण निकाल 99.32% लागला असून, 'कला' विभागाचा 80.49%निकाल लागला असून, वालचंद विज्ञान.              "स्वयंअर्थसहाय्य    विभागाचा 99.02% निकाल लागला आहे. वालचंद "अनुदानित विज्ञान" विभागाचा 99.53% लागला आहे. 'विज्ञान 'विभागातील खत्री तनुश्री  प्रीतम  92.50% 'प्रथम' तर,' द्वितीय ' पवार प्रिया भारत 91% तर वडेपल्ली मनीष महेश -88.17% गुण मिळून" "तृतीय क्रमांक" प्राप्त केला. "कला" विभागातून, बिराजदार अनुष्का यशवंत व तडगोपुल अंकिता अंबादास हिने 89.50% गुण मिळवून विभागून "प्रथम क्रमांक" प्राप्त केला. 'द्वितीय क्रमांक' - नदाफ फरजाना  दाऊद हिने, 87.67%  तर, पोतदार भाग्यश्री सुदर्शन हिने, 85.50% गुण मिळवून,तृतीय क्रमांक प्राप्त केला. विज्ञान विभागाच्या" "स्वयंअर्थसहाय्य " विभागातील- वाघमोडे अस्मिता दत्तात्रय- हिने 88.50% गुण मिळवून  "प्रथम क्रमांक "प्राप्त केला. तर,"  भाईकट्टी साक्षी संतोष हिने 84.83% गुण प्राप्त करून" द्वितीय, 'तर.    कुरापाटी वेनेला अनिल हिने 84.50% गुण मिळवून" तृतीय क्रमांक" प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे,प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे ,  "स्वयंअर्थ साहाय्य" विभागाच्या 'समन्वयिका' सारिका महिंद्रकर ,तसेच, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा दिल्या. याप्रसंगी, यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा महाविद्यालयाकडून 'हृद्य ' सत्कार करण्यात आला.  पालक  व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शिस्त, व परीक्षांचे अचूक नियोजन तसेच सर्व शिक्षकांचे व संस्थेचे, प्राचार्यांचे, हार्दिक आभार व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments