बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 21, 2024

बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

 बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत


              सोलापूर(कटूसत्य वृत्त):- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा 5 ते 18 वर्षापर्यंत शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे, अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत.

        ज्या मुलांचे वय 5पेक्षा अधिक व 31 जुलै, 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी /जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज संस्था, शैक्षणिक संस्था इ.अर्ज करु शकतात. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त मुलांनी प्रस्ताव सादर करावेत,  असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी  अतुल वाघमारे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages