दयानंद शास्त्र महाविद्यालयाचा निकाल ९६.५१ टक्के
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दयानंद महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेचा निकाल ९६.५१ टक्के लागला आहे.
शास्त्र शाखेमधून कु. बिराजदार श्रेया सूर्यकांत ही विद्यार्थीनी ८९.१७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात सर्वप्रथम आली आहे. कु. खोबरे प्रतिक्षा सोमनाथ ही विद्यार्थीनी ८६.६७ गुण मिळवून महाविद्यालयात व्दितीय तर कु. पाटसकर श्रवणी अमित ही विद्यार्थीनी ८३.८३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय आली.
कला शाखेमध्ये कु. शेटे वैष्णवी सूर्यकांत ही विद्यार्थीनी ७६.८३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली आहे. कु. नरोणे पौर्णिमा मल्लिकार्जुन ही विद्यार्थीनी ७५.१७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात व्दितीय आली. कु. गायकवाड प्रगती धनराज ही विद्यार्थीनी ७३.५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय आली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे स्थानिक सचिव महेशजी चोप्रा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विजयकुमार उबाळे, उपप्राचार्य अरुण खांडेकर, पर्यवेक्षक प्रा. सौ. स्मिता जगताप, कला शाखेचे समन्वयक प्रा. माधव कुलकर्णी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
.jpg)
0 Comments