ज्ञानेश्वर नवरात्र महोत्सव मंडळाकडुन प्रणिती शिंदे यांना बिनशर्त पाठींबा
सोलापुर(कटूसत्य वृत्त):- शहर उत्तर मतदार संघातील उत्तर कसबा कैकाडी गल्ली,पठाण मोहल्ला व पंजाब तालीम येथील नागरिकांनी लोकसभेच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना बिनशर्त पाठींबा दिल्याची माहीती संयोजक सुमित माने यांनी दिली.मागील दोन टर्मपासुन सत्ता असुनही सोलापुर लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही.दोन्ही सत्ताधारी खासदारांनी सोलापुरला विकासापासुन वंचित ठेवल्यामुळे सोलापुरची पिछेहाट झाली आहे.सोलापुरच्या विकाससाठी व भवितव्यासाठी कैकाडी गल्ली,पंजाब तालीम व पठाण मोहल्यातील नागरीक व युवकांनी उत्स्फुर्तपणे प्रणिती शिंदे यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे.यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर पद्माकर ( नाना) काळे, विलास लोकरे,जयशंकर पाटील, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी तर सुमित माने यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुणाल माने, भारत माने, श्रीकांत हुलगे,राहुल माने,संतोष जाधव,शकील शेख,समर्थ जाधव, यश हुलगे,नुमान शेख, नितीन जाधव,ओबेद शेख,विश्वास माने,अशपाक बदामी,रोहीत जाधव,वृषभ शिंदे, विशाल चव्हाण,सुमित जाधव,सुजल गायकवाड यांनी प्रयत्न केले.यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments