Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा बांधवांनी भाजपाचे आ. राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे

 मराठा बांधवांनी भाजपाचे आ. राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आवाहन 

ज्यांनी काम केले त्यांनाच साथ देण्याची आवश्यकता !

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-महायुती सरकारने सर्व समाज घटकांचे प्रश्न सोडवून खऱ्या अर्थाने न्याय दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द काही प्रमाणात पूर्ण केला आहे. ज्यांनी काम केले त्यांना साथ देणे गरजेचे आहे. त्यामुळे मराठा समाजाने सोलापुरातील महायुती अंतर्गत भाजपाचे उमेदवार आ. राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

         महायुतीतील मराठा पदाधिकारी, नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तीनही नेते सर्व जाती धर्मातील समाज घटकांना न्याय देतात. प्रश्न सोडवितात. मराठा समाजालाही न्याय दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिलेला शब्द काही प्रमाणात पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र कमी वेळात शोधून काढले. युद्ध पातळीवर हे काम मार्गी लावले. काँग्रेसने हे काम केले नाही.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्जपुरवठा झाल्याने 80 हजार मराठा उद्योजक आज कार्यरत आहेत. सारथी संस्थेची स्थापना केली. दरम्यान, मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.

       महाविकास आघाडी सरकारने आरक्षणावर कधी सकारात्मक चर्चा केली नाही. आर्थिक विकास महामंडळ बंद करून निधी दिला नाही. सारथी संस्था बंद करून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान केले. मराठा आरक्षणाच्या एकाही मोर्चाला , आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भेट व चर्चा केली नसल्याचा आरोप यावेळी पाटील यांनी केला.

तर महायुतीच्या काळात  मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले. ज्यांनी काम केले त्यांना साथ देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी, त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रचार करीत आहोत. मराठा समाजाने भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

          या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेनेचे समन्वयक दिलीप कोल्हे, तुकाराम मस्के, भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजीत पवार, माजी नगरसेवक अनंत जाधव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष सुहास कदम , रयत क्रांतीचे नामदेवराव पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 


Reactions

Post a Comment

0 Comments