Ads

Ads Area

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरणार अर्ज

 महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे जोरदार 

शक्तीप्रदर्शन करत भरणार अर्ज

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या आज (गुरूवार ता.१८) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार चंद्रकात हांडोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

इंडिया-मविआ आघाडीच्या, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. गुरूवार सकाळी ९.३० वाजता या रॅलीला सुरूवात होणार असून ही रॅली काँग्रेस भवन, पानगल प्रशाला सिव्हिल चौक, बेडर फुल, जगदंबा चौक, सातरस्ता या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल होणार आहे. यानंतर प्रणिती शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर,  राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे, सुधीर खरटमल, महेश गादेकर, विश्वनाथ चाकोते, शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बरडे, उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, अजय दासरी, गणेश वानकर, यु एन बेरिया, अमर पाटील, उत्तमप्रकाश खंदारे, भारत जाधव, प्रमोद गायकवाड, तौफिक शेख, एम एच शेख, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम. पाटील, शहर अध्यक्ष निखिल किरनाळे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सुरेश हसापूरे आदी मान्यवर नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी सोलापूर शहर व मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार आणि शहर कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले आहे..


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close