Ads

Ads Area

मोहोळ शहरवासीयांच्या पदरी पाणीपुरवठ्याच्या बाबत वणवण भटकण्याची वेळ

 मोहोळ शहरवासीयांच्या पदरी पाणीपुरवठ्याच्या बाबत

वणवण भटकण्याची वेळ

मोहोळ(कटूसत्य वृत्त):-मोहोळ हे तालुक्याचे शहर असून या ठिकाणी गत सात वर्षांपूर्वी नगरपरिषदेची स्थापना झाली. नगरपरिषदेची स्थापना होऊन इतका कालावधी लोटूनही या शहराला पाणीपुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता आले नाही. ठेकेदारीच्या मागे लागलेले नगरसेवक, राजकीय घटकांची पोथी ओळखलेले प्रशासन या सर्वांच्या वेळ काढूनपणामुळे मोहोळ शहरवासीयांच्या पदरी पाणीपुरवठ्याच्या बाबत वणवण भटकण्याची वेळ आली आहे. सध्या महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे या प्रशासनाला टंचाईचा म्हणावा तसा आढावा घेण्यास वेळ मिळत नाही. नदीत पाणी किती आहे यापेक्षा नदीत वाळू किती आहे? याकडेच पदाधिकाऱ्यांबरोबर प्रशासकीय घटकांचे लक्ष आहे. वाळू मधील मंथलीचे अर्थकारण महसूलप्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनालाही सुखावत असल्यामुळे मोहोळच्या मधाची गोडी वरिष्ठांनाही लागली आहे का? असा प्रश्न सामान्यांना पडतो. त्यामुळे पाणी संपून शहर उद्धवस्त झालं तरी चालेल मात्र मनी ओरिएंटेड कारभारच व्हायला हवा, अशी भूमिका सर्वांची आहे. शंभर टक्के वाळूवर अर्थकारण आणि राजकारण चालणाऱ्या मोहोळची अवस्था किती दयनीय आहे याचा विचारच करायला नको. त्यामुळे सर्वांनाच नदीतील पाण्यापेक्षा वाळूची काळजी मोठी आहे. आपापल्या प्रभागातील मतदारांची नाराजी ऐन मतदानाच्या काळात ओढवू नये म्हणून ज्या-त्या नगरसेवकांनी आपापल्या परीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. विकास होतोय असे म्हणणारे नेते, मोठमोठे होर्डिंग लावणारे पदाधिकारी आणि रात्रंदिवस स्टेट्सला विकासाच्या पोस्ट शेअर करणारे कार्यकर्ते या सर्वांना शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाबाबत काहीच कसे वाटत नाही, हाच खरा प्रश्न आहे.


येत्या काही दिवसात मोहोळ येथील जागृत ग्रामदैवत आणि जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्ध नागेश महाराजांची यात्रा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असलेला भक्त यात्रेच्या गणाला आणि खर्गाला उपस्थित असतोच. दरवेळी आलेल्या या अनिवासी मोहोळकर असलेल्या भाविकांना शहरातील पाणीपुरवठ्याची विदारक परिस्थिती दिसतेच. त्यामुळे चार दिवस यात्रा कालावधीत भक्ती भावाने आलेल्या त्या सर्व भाविकांना दोन दिवसातच आपापल्या मूळ गावी केवळ पाणी नसल्यामुळे परत जावे लागते. हे नक्की कोणाचे अपयश म्हणावे लागेल राजकीय नेत्यांचे की निमुटपणे मतदान देणाऱ्या मोहोळकरांचे ?

.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close