Ads

Ads Area

आमदारांच्या नाहीतर जनतेच्या विश्वासावर मोहीते-पाटलांची उमेदवारी

 आमदारांच्या नाहीतर जनतेच्या विश्वासावर मोहीते-पाटलांची उमेदवारी 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक  लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठे शक्तिप्रदर्शन न करता साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज भरला. जनतेला व मोहीते पाटील यांना फसवणाऱ्या भारतीय जनता पक्षास धडा शिकवण्यासाठी ही उमेदवारी असल्याच बोलल जात आहे. याचवेळी त्यांचे चुलते, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पूरक अर्ज दाखल केला.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी न दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज आपला उमेदवारी अर्ज भरला.

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द झाला, त्यामुळे मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता साधेपणाने भरला.

एकीकडे भाजपच्या उमेदवारांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची जोड मिळाली असताना दुसरीकडे भाजपला जोरदार झटका देत राष्ट्रवादी शरद पवार गटाची ‘तुतारी’ हाती घेऊन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन टाळले. आपले शक्तिप्रदर्शन ४ जून रोजी विजयोत्सवातून शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी अकलूजहून आल्यानंतर प्रथम बाळे येथील श्री खंडोबाचे दर्शन घेतले.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निवडणूक अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, काँग्रेसचेजिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आदी हजर होते.

उमेदवारी दाखल करण्यासाठी सोलापुरात दाखल झाल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांना सोबत घेऊन ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे बंधू जयसिंह मोहिते-पाटील यांनी सात रस्त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. याशिवाय रेल्वे लाईन भागात सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यासह सिध्देश्वर देवस्थान व अन्य मोठ्या संस्थांशी संबंधित बडे प्रस्थ समजले जाणारे धर्मराज काडादी यांच्या गंगा निवास’मध्ये जाऊन त्यांचीही भेट घेतली. सुशीलकुमार शिंदे व काडादी यांच्याशी मोहिते-पाटील यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खलबते झाली.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close