Hot Posts

6/recent/ticker-posts

मनोरमा बँकेचा 0% थकबाकीचा षटकार

 मनोरमा बँकेचा 0% थकबाकीचा षटकार

1001 कोटींचा व्यवसाय, दरवर्षी सभासदांना लाभांश देणारी

 एकमेव  सहकारी बँक


सोलापूर(कटूसत्यवृत्त):- ठेवीदार, कर्जदार, खातेदार यांच्या मोठ्या विश्वासावर उ उतुंग झेप घेणारी मनोरमा सहकारी बँकेची मोठी घोडदौड सुरू असून, बँकेच्या आठ  शाखा आहेत, नववी शाखा  लवकरच सुरू करणार आहोत. बँकेला यंदा 4 कोटी 25 लाखांचा निव्वळ नफा झाला असून आपल्या सभासदांना सतत लाभांश देणारी मनोरमा बँक ही वित्तीय संस्था अधिक बळकट आणि सक्षम असल्याचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी सांगितले.

आदर्श वित्तीय संस्था म्हणून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या सोलापूर येथील मनोरमा सहकारी बँकेने मार्च 2024 अखेर एक हजार एक कोटी रुपयांच्या व्यवसायाची गगन भरारी घेत सतत 6 वर्षी 0% एनपीए ठेवण्याची कामगिरी केली असून बँकिंग क्षेत्रात एक नवा मापदंड आणि आयाम निर्माण केल्याचं या बँकेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील अर्थतज्ञ श्रीकांत मोरे यांनी आज सांगितले.


विविध कारणांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध बँका अडचणीत असताना मनोरमा सहकारी बँकेने मात्र आपले वेगळेपण जपत विविध क्षेत्रातील आपला नावलौकिक कायम राखल्याचे चेअरमन यांनी सांगितले. बँकेचे या दैदिप्यमान यशामध्ये ठेवीदार, कर्जदार, खातेदार, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच हितचिंतक यांचा वाटा असल्याचे सांगत सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे सलग 6 वर्षी 0% एनपीए आणि 1001 कोटींचा व्यवसाय झाल्याचं ते म्हणाले.

बँकेच्या या यशाबद्दल अधिक माहिती देताना अध्यक्ष श्रीकांत मोरे म्हणाले की मनोरमा परिवारातर्फे ही बँक चालवली जाते. मनोरमा परिवार हा आईच्या प्रेमाचा परिवार आहे आईच्या पवित्र नावाने बँक चालवीत असताना माया, ममता, प्रेम, वात्सल्य, बंधुता, जिव्हाळा जपत नातेसंबंध टिकवत ही बँक चालवली जाते यामुळे बँकेची प्रगती होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments