Hot Posts

6/recent/ticker-posts

लेखक इंद्रजित पाटील लिखित ' शेलक्या बारा ' कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

 लेखक इंद्रजित पाटील लिखित ' शेलक्या बारा '

 कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

  नागपूर(कटूसत्य वृत्त):- जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,नागपूर या संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनाचे आैचित्य साधून लेखक इंद्रजित पाटील यांच्या ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गाैरवण्यात आले. हा पुरस्कार साेलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक याेगीराज वाघमारे यांच्या नावाने देण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डाॅ.दीपककुमार खाेब्रागडे,सरचिटणीस डाॅ.रविंद्र तिरपुडे,सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामांकित साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस, प्राचार्या वैशाली प्रधान,आमदार विक्रम काळे,डाॅ.सुनील रामटेके,डाॅ.विद्याधर बन्साेड व इतर मान्यवरांच्या हस्ते नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन,मधुरम सभागृह,दुसरा माळा,झाशी राणी चाैक, सीताबर्डी या ठिकाणी देण्यात आला. शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहास हा पहिलाच मानाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार लेखक इंद्रजित पाटील काही कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ.अनंता सूर यांनी स्वीकारला.


     लेखक इंद्रजित पाटील यांची साहित्यक्षेत्रातील गरूड भरारी पाहून श्री.माधवरावजी कुतवळ,जनसेवक अमाेल ( भैया ) कुतवळ,पंडितराव लाेहाेकरे,चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,डाॅ.सुनील विभुते,आबासाहेब घावटे,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन  केले व पुढील साहित्यिक कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

           लेखक इंद्रजित पाटील यांचे ' चातक ' ' चाकरी ' कवितासंग्रह,जीवनाचा उपासक - कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी चरित्र ग्रंथ ही पुस्तके प्रकाशित झाली असून ' कळ पाेटी आली आेठी ' अष्टाक्षरी कवितासंग्रह, चिबाड,चऱ्हाट,काव्यगाणी कवितासंग्रह,सुवासिनीचं कुंकू तीन अंकी नाटक,चाराेळीची-आराेळी चाराेळी संग्रह,लापनिका लावणी संग्रह,अभंगवाणी अभंग संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.साहित्य क्षेत्रात आपल्या दर्जेदार लिखाणाने स्वतंत्र ठसा उमटवण्यात लेखक इंद्रजित पाटील यशस्वी ठरले आहेत.त्यामुळे त्यांचे विशेष काैतुक हाेत आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments