Hot Posts

6/recent/ticker-posts

पोषण आहार धान्याचा अपहार करून विक्री करणारे राजश्री शाहू शाळेच्या मुख्याध्यापिका व संस्थाध्यक्षवर गुन्हा दाखल करा - छावा

 पोषण आहार धान्याचा अपहार करून विक्री करणारे राजश्री शाहू शाळेच्या

 मुख्याध्यापिका व संस्थाध्यक्षवर गुन्हा दाखल करा - छावा


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-मराठा समाज सेवा मंडळ संचलित राजश्री शाहू प्रशाला, विडी घरकुल, या शाळेत प्राथमिक विद्यार्थ्यासाठी पोषण आहारासाठी शासनाकडून येणारे धान्याचा अपहार करून ते धान्य खुल्या बाजारात विक्री केले जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली असून याबाबत पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय छावाचे योगेश पवार यांनी पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, मराठा समाज सेवा मंडळाचे संस्थाध्यक्ष मनोहर सपाटे यांचे राजश्री शाहूच्या मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे ह्या पोषण आहारातील धान्य (तांदूळ, साखर, तेल पाकीट) हे खुल्या बाजारात विक्री करून, ती रक्कम सपाटे व सोलापुरे हे दोघे घेतात. प्राथमिक विद्यार्थ्यांच्या तोंडात माती टाकून व उपाशी ठेवून धान्याचा अपहार करून विकले जाते. दि. 02/03/2024 रोजी सायंकाळी 03-30 ते 05-00 आसपास पोषण आहार धान्याचा अपहार करून विक्री करण्याचा प्रकार एका पत्रकाराने उघडकीस आणला आहे. मुख्याध्यापिका सोलापुरे यांनी गाडी चालकाकडून 17,000/ रुपये घेवून जवळपास 06 टन तांदूळ, साखर, तेल पाकीट असे धान्य शाळेतून अॅपे (टमटम) गाडी नंबर MH 13 CT 8617 या गाडीतून गाडी चालकामार्फत सोहेल कलबुरगी यांस देण्यासाठी बाहेर काढून विक्री केले. पत्रकारांनी ती गाडी अडवून त्याची चौकशी केली व विडिओ काढले. व ती पत्रकारांने ती गाडी MIDC पोलीस स्टेशन येथे जमा केली.

त्यानंतर सपाटे व सोलापुरे यांनी पत्रकार व पोलिसांना लाच देतोय, असे दाखवून एसीबीमार्फत ट्रपचा प्रयत्न चालविला. परंतु पोलीस, पत्रकार हे गुन्हा दाखल करण्यावर ठाम असल्यामुळे त्यांचा प्लॅन फसला. म्हणून मनोहर सपाटे व सोलापुरे मॅडम यांनी अन्न धान्य वितरण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना राजकीय नेत्यांमार्फत पैसे देवून मॅनेज करून या प्रकरणातून सुटण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त व जिल्हा प्रशासनांनी तातडीने याची दखल घेवून यातील दोषींवर गुन्हा दाखल करावा किंवा खाजगी फिर्याद दाखल करणेसाठी सीआरपीसीचे कलम 197 अन्वयेची परवानगी द्यावी, अशी मागणी योगेश पवार यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व शिक्षणाधिकारी यांचेकडे केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments