Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात सोमवारपासून दोन दिवसांचा ग्रंथोत्सव पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 सोलापुरात सोमवारपासून दोन दिवसांचा ग्रंथोत्सव

 पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जिल्ह्यातील ग्रामीण  व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ, साहित्य आणि वाड्.मय विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत, प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी ग्रंथ विक्री करता यावी याच उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  सोमवार दिनांक ११  आणि मंगळवार दिनांक १२ मार्च  या दोन दिवसीय कालावधीत दयानंद शिक्षण संस्थेच्या वेलनकर सभागृह  सोलापूर येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी दिली.

     ग्रंथोत्सव कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून सोमवार  दि. ११ मार्च  रोजी सकाळी १० वाजता दयानंद काशीनाथ आसावा प्रशालेच्या प्रागणातून ते दयानंद संस्थेच्या वेलनकर सभागृह या कार्यक्रम  स्थळापर्यत निघणार आहे. ग्रंथदिंडीचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप  असणार आहेत. तर सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती शालीनी इंगोले, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ग्रंथमित्र गुलाबराव पाटील, प्रशालेचे प्राचार्य जितेन्द पवार, कवी मारुती कटकधोंड, श्री हिराचंद वाचनालयचे कार्यवाह  श्रीकांत येळेगांवकर, ग्रंथमित्र कुंडलीक मोरे, मसापचे जिल्हा प्रतिनिधी पदमाकर कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय संघाचे विजय पवार, साहेबराव शिंदे, प्रकाश शिंदे, ज्योतीराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

     दयानंद शिक्षण संस्थेच्या वेलनकर सभागृह येथे सकाळी ११ वाजा कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते  होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संसद सदस्य डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर सोलापूर विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहायक ग्रंथालय संचालक शालीनी इंगोले, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते, श्रीमती  श्रुती वडकबाळकर साहित्यीक सोलापूर, दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य  श्रीरंग क्षीरसागर, विजयकुमार उबाळे आदी मान्यवर  उपस्थित राहणार आहेत. 

       या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सोलापूर- माढा-धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि सोलापूर जिल्हातील विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य व जिल्हयातील प्रशासकीय अधिका-यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

      दुपारी २ वाजता  वाजता "समाज माध्यमांचे मराठी साहित्यावरील परिणाम" या विषयावार परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रंथमित्र हरिदास रणदिवे राहणार आहेत. तर पत्रकार अरविंद जोशी, भरतकुमार मोरे, शिवाजी शिंदे, देविदास गायकवाड यांचा सहभाग राहणार आहे. सायंकाळी ४ वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन राजेद्र भोसले, यांचे अध्यक्षेखाली होणार असून डॉ.स्मिता पाटील (मोहोळ), लक्ष्मण हेबांडे (मंगळवेढा), फुलचंद नागटीळक(माढा), इंद्रजीत पाटील (बार्शी), रविंद्र जवंजाळ(सांगोला),   कवी. शिवाजीराव सातपुते, मारुती कटकधोंड, बड्डीउजमा बिराजदार, वंदना कुलकर्णी, रामप्रभु माने, रेणुका बुधाराम, वैभव कुलकर्णी, युवराज जगताप, हे सोलापूरचे कवी सहभागी होणार आहेत.

        मंगळवार दिनांक ११ मार्च रोजी सकाळी ११  वाजता "शिवचरित्र आणि शिवराज्याभिषेक" या विषयावर  ज्येष्ठ इतिहासकार  डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभणार असून अध्यक्ष म्हणून मनोरमा साहित्य परिषद सोलापूरचे श्रीकांत मोरे राहणार आहेत. दुपारी एक वाजता स्पर्धा परीक्षा यशाची गुरुकील्ली या विषयावर नेट सेट परीक्षा उत्तीर्ण विक्रमवीर धानय्या कौटगीमठ अक्क्लकोट हे मार्गदर्शन करणार आहेत..युनिक ॲकॅडमी पुणेचे संचालक  संदीप जगदाळे  अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

       तर ग्रंथोत्सवाचा समारोप सायंकाळी ४ वाजता  "वाचन संस्कृती काळाची गरज" या विषयावर  अक्क्लकोट येथील श्रीमंत शहाजी राजे भोसले वाचनालयाच्या  अध्यक्षा शैलशिल्प जाधव यांचे मार्गदर्शनाने होणार आहे. अतिथि म्हणून दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती. एस जे गायकवाड, तर याप्रसंगी ग्रंथमित्र कुंडलीक मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. 

       सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती शालीनी इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या जिल्हा सोलापूर ग्रंथोत्सव-२०२३ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी  जिल्हा माहिती अधिकारी, सुनलि सोनटक्के, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, ग्रंथमित्र हरिदास रणदिवे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी, कल्यानराव शिंदे, कार्यकर्ते ग्रंथमित्र कुंडलीक मोरे, ज्योतीराम गायकवाड, प्रकश शिंदे, धोंडीराम जेवूरकर, दत्तात्रय बाबर, सुधाकर खैराट, सुरेश यादव, छायाताई आखाडे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, प्रविण पाठक, रनजित भंडारे, गीताताई देशपांडे, दत्तात्रय घोलप, दिलीप देशपांडे, प्रमोद पाटील, प्रदीप गाडे, येल्लप्पा घोडके , जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

      सदर दोन दिवसीय कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह ग्रंथप्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले असून शासकीय प्रकाशने, बालभारती, ऋषिकेश बुक डेपो, साई बुक डेपो, नंदादिप प्रकाशन, युनिक प्रकाशन पुणे, मैत्री बुक डेपो, शिवश्क्ती बुक डेपो, सुविद्या प्रकाशन,अक्षर एजंन्सी, पलूस, साई शाम पुस्तकालय, लातुर, हार्टी बुक गॅलरी, लातुर नाथ प्रकाशन सातारा, शब्दशिवार प्रकाशने,अरविंद बुक डेपो, पुणे, अशा विविध प्रकाशनांची ग्रंथदालने उपलब्ध होणार असून सोलापूर जिल्हयातील ग्रंथ व वाचक प्रेमींनी या ग्रंथ महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments