पोलिसांची प्रतिमा मलीनः पत्रकार निर्दोष - एडवोकेट रियाज N. शेख
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-प्राईम महाराष्ट्र सोलापूर यूट्यूब चैनल वरती जेलरोड पोलीस स्टेशन येथे मटका संदर्भात नगरसेवक कामाठी आणि पापाशेठ यांच्यात खडाजंगी या शीर्षकाखाली बातमी प्रसारित करून पोलिसांची बदनामी करून पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलिन होण्याच्या उद्देशाने खोटी बातमी लावल्याच्या आरोपातून प्राईम महाराष्ट्र युट्युब न्यूज चैनल चे पत्रकार शहानवाज शेख यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्रशांत बी वराडे यांनी पारित केलेले आहे.
यात घटनेची थोडक्यात हाकिकत अशी आहे की - दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण नेमणूक- जेलरोड पोलीस स्टेशन, सोलापूर हे जेलरोड पोलीस स्टेशन येथे नेहमीप्रमाणे कामकाज करत असताना त्यांच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप वर प्राईम महाराष्ट्र सोलापूर युट्युब चॅनेल ची बातमी आली व सदर बातमी ओपन करून पाहिले असता त्यामध्ये मटका संदर्भात पोलीस ठाण्यातच नगरसेवक कामाठी आणि पापाशेठ यांच्यात खडाजंगी या मताळ्याखाली बातमी प्रसारित करून जेलरोड पोलीस ठाण्याचा बदनामीकारक व्हिडिओ जनमाणसांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा मलिन व्हावी या उद्देशाने प्रसारित केल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता जेलरोड पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही घटना घडलेली नव्हती त्यामुळे सदरची बातमी प्रसिद्ध करून अफवा पसरवून पोलिसांविरुद्ध अप्रतिची भावना निर्माण झाल्याच्या कारणास्तव यूट्यूब प्राईम महाराष्ट्र युट्युब न्यूज चैनल चे पत्रकार शहानवाज शेख यांच्याविरुद्ध पोलीस नाईक 1424 इरफान इलाही पठाण नेमणूक- जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी फिर्याद दिली होती.
सदर फिर्यादीवरून आरोपी पत्रकार शाहनवाज शेख यांच्याविरुद्ध पोलीस अप्रतिची भावना चेतवणे अधिनियम 1922 चे कलम ३ तसेच पुरावा नष्ट केल्याचे भादवि कलम 201 अन्वय गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक लोंढे यांनी करून आरोपी पत्रकार शहानवाज शेख यांच्याविरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत बी. वराडे यांच्या कोर्टामध्ये झाली सरकार पक्षातर्फे फिर्यादी व इतर साक्षीदार तपासण्यात आले.
सदर खटल्याच्या अंतिम युक्तीवादावेळी आरोपीतर्फे एडवोकेट रियाज एन शेख यांनी आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीने बातमी प्रसिद्ध केल्याची निर्विवाद पणे सरकार पक्षाने साबित केलेले नाही. तसेच यूट्यूब चैनल वरील बातमी कोणीही एडिटिंग करून त्यामध्ये बदल करू शकतो त्यामुळे आरोपीनेच सदरचा व्हिडिओ बनवला व तो प्रसारित केला हे सांगता येत नाही. तसेच सदर केस मध्ये स्वतंत्र साक्षीदार कोणीही समोर आलेले नाहीत वगैरे युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी वराडे यांनी आरोपी पत्रकार शहानवाज शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले.
सदर खटल्यामध्ये आरोपी पत्रकार तर्फे एडवोकेट रियाज एन. शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे एडवोकेट जे वी चेळेकर यांनी काम पाहिले

0 Comments