लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातुन २ जण उमेदवारी अर्ज दाखल केले
जाणार,माढ्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
माढा (कटूसत्य वृत्त):-मराठ्यांना ओबिसीतुनच आरक्षण द्यावे आरक्षण न दिल्यास येत्या माढा लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातुन २ ते ३ समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.माढ्यात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा एकमताने निर्णय घेतला आहे.सगे सोयरे अध्यादेशाचा कायदा पारित न झाल्यास मराठा समाजाचा सरकारला उद्रेक पहायला मिळेल.मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षण लढ्याच्या समर्थनार्थ माढ्यातील जगदाळे मंगल कार्यालयात माढा शहरासह परिसरातील गावातील समाज बांधवाची बैठक पार पडली. मराठा आरक्षण लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघासाठी माढा परिसरातील प्रत्येक गावातून दोन ते तीन उमेदवार सकल मराठा समाजाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून यामध्ये मराठा समाजासह इतर घटकातील देखील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय माढ्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारने फसवे आरक्षण दिले असून सगे सोयरे बाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करत आरक्षणाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका देखील यावेळी मराठा बांधवानी बोलताना व्यक्त केली.यावेळी शंभू साठे,बाबा मस्के,बबन पाटील,बाळासाहेब चव्हाण, रानबा कदम,रुपेश आडकर, शरद वारगड,शहाजी कदम,बाळासाहेब चवरे ,श्याम गवळी,पृथ्वीराज साठे,मोहन चव्हाण,दीपक गव्हाणे,अक्रम कुरेशी,संदीप साठे,महेश जाधव, केशव शेंडगे, प्रमोद विद्यागज, सुरज काशीद, बालाजी बारबोले , आनंद कदम, सचिन उबाळे, यांचेसह माढा सह परिसरातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते
.jpg)
0 Comments